Chhagan Bhujbal News : दूध उत्पादकांची प्राथमिक दूध संकलन केंद्रावर फसवणूक होऊ नये म्हणून जिल्हा सहकारी दूध संस्था, वैधमापनशास्त्र अधिकारी आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्षात वजन मापा संबंधी पाहणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले. (Chhagan Bhujbal statement about Submit Inspection Report of Primary Milk Collection Center nashik news)
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यादृष्टीने अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी अशी सूचना केली. यावेळी सचिव सुमंत भांगे, वैधमापन शास्त्रचे सह नियंत्रक विलास पवार, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, संभाजी ब्रिगेडचे राज्य सह संघटक रूपेश पाटील यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, की ‘फॅट' व एस.एन.एफ. तपासणी यंत्रावर तफावत आढळत असल्याने प्राथमिकस्तरावर दूध संकलन केंद्रामध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे आणि अन्य साधने वापरून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
त्यामुळे संघाच्या इलेक्ट्रॉनिक वजन काटे व अन्य साधनांमध्ये फेरबदल करता येतो का? याबाबत तपासणी करण्यात यावी.
वजन-मापे यंत्रावर नोंदवलेला ‘कन्वर्जन फॅक्टर’ हा बरोबर आहे अथवा नाही याबाबत सखोल तपासणी करावी. प्राथमिक दूध संस्थांमधील इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांवर दुधाचे घनफळ व वजन दोन्ही मोजमाप होऊन त्यांची नोंद शेतकऱ्याला दिल्या जाणाऱ्या पावतीवर होण्यासंबंधी तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.