येवला (जि. नाशिक) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून द्यायचे आहेत. मतदासंघांत सुमारे १६६ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या समित्या तयार करण्यात याव्यात, अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या. (Chhagan Bhujbal statement Discussion on useless things to ignore inflation unemployment nashik news)
महागाई, बेरोजगारीसह प्रमुख समस्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी निरर्थक गोष्टींवर चर्चा होत असल्याची टीका त्यानी केली.
मतदासंघांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली येवला येथील संपर्क कार्यालयात झाली. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, अरुण थोरात, हुसेन शेख, संजय बनकर, अकबर शहा आदी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, की राज्यात महागाई, शेती, रोजगार, शिक्षण यांसह अनेक प्रश्न आपल्या समोर असताना राज्यात मात्र इतर निरर्थक विषयांना अधिक महत्त्व देऊन चर्चा केली जात आहे. राज्यात महापुरुषांचा अपमान सातत्याने केला जात आहे. या विरोधात महाविकास आघाडीतर्फे मोर्चादेखील काढण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात जो बोलेल त्याचा आवाज दाबला जात आहे. त्यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देण्यात येत आहे. आपल्याला राज्यघटनेवर आधारित लोकशाही हवी आहे, यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे. या देशासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी बलिदान दिलं आहे. त्यामुळे आपल्याला या सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे.
आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी गावागावांत तसेच शहरातील प्रत्येक वॉर्डात संघटन मजबूत करावे. सर्व सेलाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारिणी नव्याने तयार करून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना संधी द्यावी.
महिलांनी आपली कार्यकारिणी अतिशय सक्षम करून महिलांची संख्या वाढवावी. आठ दिवसांनी सर्व सेलची स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीला तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, भाऊसाहेब भवर, शहराध्यक्ष दीपक लोणारी, राजश्री पहीलवान, प्रकाश वाघ, मोहन शेलार, मकरंद सोनवणे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, ॲड. राहुल भालेराव, सचिन कळमकर, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, सुभाष गांगुर्डे, मुश्रीफ शेख, सुमित थोरात, संतोष राऊळ, भूषण लाघवे, शकील पटेल, सचिन सोनवणे, गणेश गवळी, भानुदास जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.