Nashik Chhagan Bhujbal : जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक रोजगारासाठी कटिबद्ध : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal statement in job fair about local employment for youth nashik news
Chhagan Bhujbal statement in job fair about local employment for youth nashik news esakal
Updated on

Nashik Chhagan Bhujbal : जिल्ह्यात उद्योगांचा अधिक विकास करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्य सरकारच्या माध्यमातून बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (ता. ७) येथे केले.

राष्ट्रवादी भवनात झालेल्या नोकरी महोत्सवाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या महोत्सवात तीन हजार तरुणांनी सहभाग नोंदवला. (Chhagan Bhujbal statement in job fair about local employment for youth nashik news )

श्री. भुजबळ म्हणाले, की जिल्ह्यात विविध विकासकामे करून उद्योगांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पर्यटन, कृषी, ‘मेडिकल टुरिझम’ला अधिक वाव आहे.

यापुढील काळात आयटी हब यांसह अनेक उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न करत नोकरीच्या संधी निर्माण करण्यात येतील. राज्य सरकारचा ‘आझादी का अमृतमहोत्सव’च्या माध्यमातून ७५ हजार सरकारी नोकरी देण्याचा मानस आहे.

‘स्ट्रीट फूड’ वाहनांचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तरुणांना रोजगारासह स्वयम रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री स्वयम रोजगार योजनेच्या माध्यमातून ‘स्ट्रीट फूड’ वाहनांचे वाटप करण्यात आले. यापुढे तरुणांना रोजगार मिळण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले जातील.

त्यासाठी पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन करून जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. श्री. चव्हाण यांनी संवाद साधला. श्री. ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. अंबादास खैरे यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Chhagan Bhujbal statement in job fair about local employment for youth nashik news
Ajit Pawar News : अजित पवारांच्या पुढाकाराने नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाबाबत आज बैठक

समीर भुजबळांचे नियोजन अन् ५० कंपन्यांचा सहभाग

नोकरी महोत्सवाचे नियोजन समीर भुजबळ यांनी केले. पंधरा दिवसांपासून महोत्सवाची माहिती शहर आणि जिल्ह्यात पोचवली. त्यामुळे महोत्सवासाठी साडेआठ हजारांहून अधिक तरुणांनी नोंदणी केली. महोत्सवात पन्नासहून अधिक कंपन्या, संस्थांचा सहभाग राहिला.

त्यात पुणे आणि नाशिकमधील उद्योग, कॉर्पोरेट, फायनान्स, सेवा क्षेत्राचा समावेश होता. महोत्सवात सहभागी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात आल्या. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकीसह सर्व विभागांतील पदवीधर उमेदवारांसाठीच्या महोत्सवाला ‘जॉब फेअर इंडिया’ कंपनीने सहकार्य केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा महोत्सव झाला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नाना महाले, बाळासाहेब कर्डक, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष गोरख बोडके, विष्णुपंत म्हैसधुणे, डॉ. शेफाली भुजबळ, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजूरकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, कविता कर्डक आदी उपस्थित होते.

Chhagan Bhujbal statement in job fair about local employment for youth nashik news
Chhagan Bhujbal: उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटवून सुशोभीकरण करा: छगन भुजबळांची बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.