नाशिक : काँग्रेसकडील राज्य काबीज करताना भारतीय जनता पक्षाने यश मिळविले असून, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आहे. भाजपच्या बाजूने राजकारण झुकल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे.
लोकसभेतही हेच चित्र उमटेल, असा दावा अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (ता. ३) केला. (Chhagan Bhujbal statement on legislative assembly election bjp win nashik political)
निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर सकाळी मोजणीला सुरवात झालेली असताना माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधत निकालावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की छत्तीसगड काँग्रेसकडे असताना तिथे भाजपने आघाडी घेतली.
राजस्थानातही भाजप आले. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस येईल, असा काहींचा अंदाज होता; परंतु तसे झाले नाही. आता तेलंगणा हे एकमेव राज्य काँगेसकडे आले. चारपैकी तीन मोठी राज्य भाजपकडे आली.
यातून पंतप्रधान मोदी यांचा करिश्मा वाढल्याचे चित्र स्पष्ट होते. इंडिया आघाडीवर बोलताना ते म्हणाले, की इंडिया आघाडी एकत्रित लढली तर वेगळं काहीतरी घडेल, असं वाटत होतं.
पण, तसं काही दिसत नाहीये. तेलंगणात अशीही भाजप नव्हती. ‘बीआरएस’बाबत ते म्हणाले, की या पक्षाची स्वतःच्या राज्यातील भिस्त होती, तीही गेली. आता ‘बीआरएस’ अडचणीत आली असून, महाराष्ट्रातही फारसा प्रभाव दिसणार नसल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.