Chhagan Bhujbal : शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे शिवसेनेच्या ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकले, तेथे मी ‘सीनिअर प्रोफेसर’ होतो, असा टोला राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आमदार गायकवाड यांना लगावला.
माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सामान्य जनतेला व आमदारांनाही आहे, मात्र राजीनामा मागण्यासाठी जी भाषा वापरली गेली, ती योग्य नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. (chhagan bhujbal trolling to MLA gaikwad nashik news)
मराठा आरक्षणासंदर्भात ‘कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळाबाहेर काढा’ अशी टीका शिंदे गटाचे आमदार गायकवाड यांनी मंत्री भुजबळ यांच्यावर केली. त्यावर भुजबळ यांनी त्यांना भाषा जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. गायकवाड यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री शिंदे पाहतील.
मला मंत्रिमंडळात बाहेर काढायचे की ठेवायचे, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. ज्येष्ठ नेते आनंद दिघे व शिवसेनेच्या इतर ज्येष्ठ नेत्यांबरोबर नेता म्हणून मी काम केलेले आहे, अशी आठवण भुजबळ यांनी गायकवाड यांना करून दिली.
ते म्हणाले, की मी मंत्री आहे. माझ्याविरुद्ध अजून तरी कोणी काही बोलले नाही. मी जे काही करीत आहे, त्याबाबत अजित पवार म्हणाले, की ते ओबीसींचे काम करीत आहेत, त्यांना तो हक्क आहे. तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोलतात, तसे तेही त्यांच्या समाजाबाबत बोलत आहेत, असे स्पष्टीकरणही भुजबळ यांनी दिले.
मनोज जरांगे-पाटील हे पुन्हा आंदोलनाला बसणार आहेत, यावर बोलताना भुजबळ यांनी ते मोठे नेते आहेत, काहीही करू शकतात. काल त्यांनी अर्थसंकल्पातून आरक्षण देण्याची मागणी केली, हे मला कधी सुचले नाही, असा टोला लगावला. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटबाबत बोलताना भुजबळ यांनी त्यांनी माझ्याबद्दल प्रेम दाखविल्याचे सांगितले.
मला हौस नाही
अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचे ट्विट केले. यावर बोलताना भुजबळ यांनी मला अजून काही माहीत नसल्याचे सांगितले. त्यांना कशी काय माहिती मिळाली, हे मला माहीत नाही. मला कुठल्या पदाची हौस नाही. अनेक वर्षांपासून मी ओबीसींसाठी काम करीत आहे. नवीन काही आता मला हवंय, असं काही नाही. यासंदर्भात माझ्याकडे काही ‘प्रपोजल’ आले नसल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.