सिडको (जि. नाशिक) : छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय, जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात संपूर्ण सिडको परिसर दुमदुमले.
सिडकोत शिवजन्मोत्सवानिमित्त भगव्या पताका भगवे ध्वजांनी परिसर नटून गेल्याचे पाहायला मिळाले.(Chhatrapati chanted the entire cidco premises shiv jayanti 2023 nashik news)
पवननगर, उत्तमनगर, तोरणानगर, सावतानगर, त्रिमूर्ती चौक, खुटवडनगर या भागात विविध मंडळांनी शिवजयंतीनिमित्त भव्य देखावे साकारले होते. शिवजन्मोत्सव समितीतर्फे पवननगरच्या मैदानावर भव्य किल्ला उभारण्यात आला. हा किल्ला सिडको परिसरातील प्रमुख आकर्षण ठरले.
किल्ला देखावा बघण्यासाठी नाशिक शहरातून नागरिकांनी पवननगर मैदान गाठले. किल्ल्यावर आल्याची शिवप्रेमींना अनुभूती मिळाली. शनिवारी (ता. १८) रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. या ठिकाणी किल्ल्याभवती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
मुख्य शिवजयंतीच्या दिवशी सकाळपासून पवननगर मैदान परिसर ढोल ताशांच्या गजराने दुमदुमून गेले. शिवप्रेमींनी सकाळपासूनच या मैदानावर किल्ला पाहण्यासाठी गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती हे विशेष आकर्षण ठरले आहे.
त्रिमूर्ती चौक येथे नवीन नाशिक सकल मराठा समाजातर्फे शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे. याठिकाणी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली.सिडकोसह अंबड गाव येथेही शिवजन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात करण्यात आला.
अंबडला सलग सहा वर्षांपासून ‘एक गाव एक शिवजन्मोत्सव’ ही संकल्पना राबवली जात आहे. खालचे चुंचाळे परिसर येथे भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसविण्यात आली. सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.