Nashik News: छत्रपती शिवाजी स्टेडियम पाडण्यापूर्वी नवीनचे भूमिपूजन! 25 कोटींतून क्रीडा संकुल उभारणार

chhatrapati shivaji maharaj stadium nashik
chhatrapati shivaji maharaj stadium nashikesakal
Updated on

Nashik News : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी स्टेडियमची जुनी इमारत पाडण्यापूर्वीच नवीन स्टेडियमचे भूमिपूजन शनिवारी (ता. १५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या ठिकाणी २५ कोटी रुपयांतून जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. (Chhatrapati Shivaji Stadium before demolishing Naveen Bhoomi Pujan 25 crores to build sports complex Nashik News)

सध्याचे स्टेडियम हे जिल्हा परिषदेच्या जागेवर उभे आहे. अनेक वर्षांपासून त्याच्या निर्लेखनाची प्रक्रिया राबविली जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

जुने स्टेडियम तसेच ठेवून नवीन इनडोअर स्टेडियमचे भूमिपूजन करण्यात आले. त्यासाठी जुने स्टेडियम पाडण्याची गरज नसल्याचे क्रीडा विभागाचे म्हणणे आहे.

पाडण्याची आवश्यकता नव्हती तर निविदा प्रक्रिया का राबवली, असाही प्रश्न उपस्थित होतो. निर्लेखनाकडे दुर्लक्ष करून आहे त्या परिस्थितीत नवीन कामाचा प्रारंभ करण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतला आहे.

१९ सप्टेंबर २०२२ ला निर्लेखनाचे टेंडर काढण्यात आले. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्याआधीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. क्रीडा विभागाला एवढी घाई करण्याचे कारण काय, असाही प्रश्न उपस्थित होतो.

जिल्हा परिषदेची ही जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करून जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यासाठी नवीन समिती स्थापन केली आहे. पालकमंत्री त्याचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी कार्यकारी अध्यक्ष आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

chhatrapati shivaji maharaj stadium nashik
Nashik News: पक्षी अभयारण्य परिसरात सुरू करावे कृषी पर्यटन; मधुमती सरदेसाई यांचे शेतकऱ्यांना आवाहन

या सुविधा असणार

सिंथेटिक ट्रॅक, इनडोअर स्टेडियम, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल मैदान, जिल्हा क्रीडा विभागाचे प्रशासकीय कार्यालय व वाहनतळ.

स्टेडियम निर्लेखनातील अडथळे

-स्टेडियम निर्लेखन निविदा प्रक्रियेत अपेक्षित रक्कम नाही

-परिणामी, अपेक्षित निविदाधारक यात सहभागी होत नाही

-तीन वेळा निविदा प्रसिद्ध करूनही अत्यल्प प्रतिसाद

-निर्लेखनाऐवजी मोकळ्या जागेत इनडोअर स्टेडियमचा निर्णय

chhatrapati shivaji maharaj stadium nashik
Dhule: गुणवत्ता नियंत्रणची विश्‍वासार्हताही कसोटीवर; बोगस कृषी निविष्टाप्रश्‍नी कृषी यंत्रणा दोषी की विक्रेते?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()