Nashik ZP News : कामे उरकण्यासाठी जिल्हा परिषद सरसावली; निधी वेळात खर्च करण्याचे निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जिल्हा दौरा, राष्ट्रीय युवा महोत्सव, पी. एम. जनमन योजनेचा शुभारंभ या कार्यक्रमांची रेलचेल असल्याने जिल्हा परिषद प्रशासन या कामात व्यस्त होती.
ZP Nashik
ZP Nashik esakal
Updated on

Nashik ZP News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जिल्हा दौरा, राष्ट्रीय युवा महोत्सव, पी. एम. जनमन योजनेचा शुभारंभ या कार्यक्रमांची रेलचेल असल्याने जिल्हा परिषद प्रशासन या कामात व्यस्त होती.

हे कार्यक्रम झाल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसहिंता लागण्याची शक्यता लक्षात घेत जिल्हा परिषद प्रशासन कामे वेळात पूर्ण करण्यासाठी सरसावली आहे. (Chief Executive Officer Ashima Mittal statement of instructed system to spend funds in time nashik zp news)

यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठकांचे सत्र सुरू केले. यात निधी वेळात खर्च करण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. श्रीमती मित्तल यांनी मंगळवारी (ता.१६) दिवसभर कार्यालयात विविध विभागांच्या बैठकाचा सपाटा लावला होता. सुरवातीस जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांचा त्यांनी आढावा घेतला.

यात, ३१ मार्च अखेर एक हजार योजना पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचे उपअभियंते, कार्यकारी अभियंता यांना निर्देश दिले. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील प्राप्त झालेला निधी खर्चाचे प्रमाण ६७ टक्के आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीचे आचारसहिंता लागण्याची शक्यता असल्याने सर्व विभागांनी तत्काळ नियोजन करण्याचे आदेश मित्तल यांनी यावेळी दिले.

ZP Nashik
Nashik ZP News: जिल्हा परिषद खरेदी करणार 6 नवीन इलेक्ट्रिक वाहने

प्रामुख्याने बांधकाम विभाग खर्चात पिछाडीवर आहे. त्यांनी लवकरच नियोजन करावे, प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश वेळात द्यावे अशा सूचनाही मित्तल यांनी केल्या. प्रशासनातील प्रलंबित प्रश्नांचाही त्यांनी आढावा घेत, त्याचा निपटारा करण्याचे सूचना प्रशासनाला दिल्या. यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे उपस्थित होत्या.

अंगणवाड्यांना जागेची अडचण

जिल्ह्यात आठ अंगणवाड्यांना जागा मिळत नसल्याची तक्रार जिल्हा परिषदेला प्राप्त झाली होती. त्यानुसार आढावा घेऊन जिल्ह्यातील पाच अंगणवाड्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. उर्वरित ३ अंगणवाड्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती मित्तल यांनी दिली. जिल्ह्यातील बिगर आदिवासी तालुक्यात ८ अंगणवाड्यांना जागा उपलब्ध होत नव्हती. अनेक दिवसांपासून तेथील ग्रामस्थांकडून सातत्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे पाठपुरावा सुरू होता.

याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर तेथील ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर मित्तल यांनी याबाबत आढावा घेतला. त्यात जिल्ह्यातील ५ अंगणवाड्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. मालेगाव व चांदवड तालुक्यातील ३ अंगणवाड्यांच्या जागेबाबत २ दिवसात अहवाल देण्याच्या सूचना मित्तल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

ZP Nashik
Nashik ZP News : जिल्ह्यातील शाळांमध्ये मुख्यमंत्र्यांचे पत्राचे वाचन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.