Nashik Youth Festival : नाशिकचा युवा महोत्सव होणार ‘न भूतो न भविष्यति' : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रामायणात महत्त्वाचे स्थान असलेल्या नाशिकमध्ये तब्बल १६ वर्षांनी होणारा राष्ट्रीय युवक महोत्सव ‘न भूतो न भविष्यति’ अशा स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.
Nashik Guardian Minister Dada Bhuse, Minister Girish Mahajan, Minister Sanjay Bansode, MPs, MLAs and administrative officers on the occasion of the unveiling of the logo of the 27th National Youth Festival.
Nashik Guardian Minister Dada Bhuse, Minister Girish Mahajan, Minister Sanjay Bansode, MPs, MLAs and administrative officers on the occasion of the unveiling of the logo of the 27th National Youth Festival.esakal
Updated on

Nashik Youth Festival : रामायणात महत्त्वाचे स्थान असलेल्या नाशिकमध्ये तब्बल १६ वर्षांनी होणारा राष्ट्रीय युवक महोत्सव ‘न भूतो न भविष्यति’ अशा स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.

त्यासाठी राज्याचे तीन मंत्र्यांनी नाशिकमध्ये ठाण मांडले असून, हा सोहळा यशस्वी झाल्यानंतरच ते मुंबईत परत येतील, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.(Chief Minister Eknath Shinde statement of Nashik youth festival will be Na Bhuto Na Bhavishya nashik news)

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त शुक्रवार (ता.१२) पासून नाशिकमध्ये राष्ट्रीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन होणाऱ्या या महोत्सवाचा लोगो व मॅस्कॉटचे अनावरण शुक्रवारी (ता. ५) नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात झाले. मुख्यमंत्री शिंदे ऑनलाइन सहभागी झाले. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार हे ऑनलाइन सहभागी झाले.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, खासदार हेमंत गोडसे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, ॲड. राहुल ढिकले, सीमा हिरे, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तब्बल १६ वर्षांनंतर महाराष्ट्राला युवक महोत्सव साजरा करण्याची संधी मिळाली. २२ जानेवारीला राम मंदिराचा सोहळा होत असताना नाशिकमध्ये युवक महोत्सव होणे हा दुर्मिळ योग आहे. रामायणात नाशिकला महत्त्व असल्याने युवा महोत्सवात तब्बल एक ते दीडलाख नागरिक सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी प्रास्ताविक केले.

Nashik Guardian Minister Dada Bhuse, Minister Girish Mahajan, Minister Sanjay Bansode, MPs, MLAs and administrative officers on the occasion of the unveiling of the logo of the 27th National Youth Festival.
Nashik Youth Festival: Anti Terror Cell कडून शहरभर कसून ‘चेकिंग’! PM मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कता

प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या लोगोचे व महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरु यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांसह खेळाडू व युवक -युवती उपस्थित होते.

पंतप्रधानांचा रोड शो

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ तारखेला पंचवटीतील मोदी मैदानावर होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नाशिक येत असून, विभागीय क्रीडा संकुल ते तपोवनातील मोदी मैदानापर्यंत त्यांचा रोड शो होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून दिली. या कार्यक्रमात तब्बल एक ते दीडलाख लोक सहभागी होणार आहेत.

असा आहे लोगो

तब्बल १६ वर्षांनी महाराष्ट्राला राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा करण्याची संधी मिळाली आहे. २७ व्या या महोत्सवाची थीम ‘विकसीत भारत २०४७’ अशी ठेवण्यात आली आहे. त्याचे प्रतीक दर्शविणारा ‘सक्षम युवा, समर्थ भारत’ असे घोषवाक्य व महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरु (मॅस्कॉट) यांचा या लोगोत समावेश करण्यात आला आहे.

Nashik Guardian Minister Dada Bhuse, Minister Girish Mahajan, Minister Sanjay Bansode, MPs, MLAs and administrative officers on the occasion of the unveiling of the logo of the 27th National Youth Festival.
Nashik Youth Festival : मोदी मैदानासह क्रीडासंकुलाची स्वच्छता; प्रत्येक राज्यातून 100 युवक-युवती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.