Nashik Political : दराडे बंधूंच्या सोहळ्यात दादासह मुख्यमंत्री शिंदे, महाजन, ठाकरेंची बॅटिंग!

Kishor Darade with CM shinde
Kishor Darade with CM shindeesakal
Updated on

Nashik Political : दोन बंधू आमदार असलेल्या कुटुंबातील विवाह सोहळ्यास शिवसेना शिंदे गट तसेच ठाकरे गट, राष्ट्रवादी, भाजप या प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांची हजेरी जिल्ह्यात चर्चेची ठरली आहे.

या मागे राजकीय बीजे देखील रुजले नसेल तर नवलच..! दराडेच्या राजकीय भूमिकेकडे डोळा ठेवत या नेत्यांनी केलेली बॅटिंग अन टाकलेली गुगली आगामी राजकीय गणितांची नांदी ठरेल हे नक्की.! (Chief Minister Shinde Mahajan Thackeray dada bhuse in Darade brothers wedding ceremony Nashik Political news)

राज्यात शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर अनेक स्थित्यंतरे झाले, अनेक मातब्बर इकडून तिकडे गेले मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाशिकचे आमदार नरेंद्र दराडे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत ठाण मांडून आहेत.

किंबहुना त्यांचा मुलगा कुणाल दराडे यांना तर नव्या रचनेत जिल्हाध्यक्षपद देखील मिळाले आहे. शिक्षक आमदार किशोर दराडे हे अपक्ष म्हणून निवडून आले असून त्यांनी सुरवातीपासूनच शिवसेना नेते उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार या सर्वांशी सलोख्याचे संबंध कायम ठेवले आहेत.

त्याचाच परिपाक म्हणजे त्यांच्या मुलाच्या लग्नाला सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची असलेली हजेरी. अर्थात हा फक्त सलोख्याचा व जिव्हाळ्याचा विषय असला तरी यामागे मात्र राजकीय समीकरणे नक्कीच दडलेली असावी हे नाकारून चालणार नाही.

येवल्यातून शिंदे गटासह भाजपकडे विधानसभेसाठी दमदार उमेदवार नसल्याने दराडे बंधूंकडे भावी उमेदवार म्हणून पहिले जात आहे. अर्थात दराडे बंधू शिवसेनेतच आहे किंबहुना नरेंद्र दराडे व कुणाल दराडे यांचे थेट उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी अतिशय जवळिकीचे संबंध आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kishor Darade with CM shinde
Nashik Politics: कही खुशी, कही गम! सत्तासंघर्षाच्या निकालावर जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया, दावे-प्रतिदावे

दराडे हवेहवेसे वाटतात : शिंदे

सत्तांतराच्या निकालाची धामधूम असताना मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने येथे विवाहासाठी हजर राहिले किंबहुना आशीर्वाद देताना त्यांनी दराडे बंधूंच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले.

आमदार दराडे बंधू सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात, हे त्यांचे उद्गार खूप काही सांगून जातात. भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी तर थेट राजकीय विषय मांडला. सामाजिक, शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रात दराडे परिवाराचे मोठे काम आहे.

दोन बंधू आमदार असून आता तिसऱ्याचीही तयारी सुरू असल्याचे सांगत त्यांनी जणू आमचे दराडेंवर लक्ष असल्याचाही संदेश दिला. आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार प्रीतम मुंडे, आमदार सीमा हिरे आदी नेतेही उपस्थित होते.

अजितदादांच्या दिलखुलास गप्पा!

विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे दुपारी दोन तास विवाह सोहळ्यानिमित्ताने उपस्थित होते. दराडे कुटुंबीयांसोबत फोटोसेशन, भोजन व गप्पाही केल्या. विशेष म्हणजे मी इतक्या लांबून आलो..मला गिफ्ट काय देणार!

असा सवाल करून त्यांनी सर्वांनाच कोड्यातही टाकले हे नक्की! माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विवाह सोहळ्यात हजेरी लावत, मामा खूप लग्न होते तरी मी तुमच्यासाठी आवर्जून आलो..असे म्हणत त्यांनीही दराडेंवरील प्रेम व्यक्त केले. आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नितीन पवार, हिरामण खोसकर या राष्ट्रवादीच्या आमदारांचीही उपस्थिती होती.

ठाकरेंसह नेतेगणही उपस्थित!

युवा सेना नेते आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी दोन्ही आमदार बुके घेऊन हजर होते. गाडीतून उतरताच ठाकरेंनी नेमका कुणाचा बुका घेऊ अशी गुगली टाकली मात्र दोघांचे बुके दोन हातात घेऊन दाद दिली.

त्यांच्यासह शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, खा. संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहीर, मनीषा कायंदे, सुनील शिंदे, विलास पोतनीस आदींसह शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख उपस्थित होते.

Kishor Darade with CM shinde
Maharashtra politics : शरद पवारांचा आदेश आल्यास 'या' मतदारसंघातून लोकसभा लढवणार; रामराजेंची मोठी घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()