ऑक्सिजन, औषधे, बेडसंख्या वाढवा - मुख्य सचिव कुंटे

 Chief Secretary Kunte
Chief Secretary KunteGoogle
Updated on

नाशिक : कोरोनाच्या पहिल्या लाटेत १९ लाख बाधित आढळले होते. त्यातील आठ टक्के बाधितांना ऑक्सिजनची गरज भासली. दुसऱ्या लाटेत ४० लाख बाधित आढळले. त्या वेळी पंधरा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासली. आता तिसऱ्या लाटेस डेल्टा प्लस व्हेरियंट कारणीभूत ठरण्याची शक्यता असल्याने रुग्णवाढीचा वेग अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्सिजन, औषधे व रुग्णालयांमध्ये बेडसंख्या वाढविण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या. (Chief Secretary Kunte instructed to increase the number of oxygen and beds in hospitals)


नाशिक दौऱ्यावर आलेल्या कुंटे यांनी विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची संयुक्त बैठक घेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की राज्यातील डॉक्टरांच्या टास्क फोर्सने डेल्टा प्लस व्हेरियंट कोरोनाच्या तिसऱ्या लाटेस कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तविली आहे. दुसरी लाट ओसरत डेल्टा प्लस या नव्या व्हेरियंटमुळे तिसऱ्या लाटेचा धोका अधिक निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या सीएसआयआर संशोधन संस्थेने ३६ जिल्ह्यांतून प्रत्येकी शंभर प्रमाणे तीन हजार ६०० कोरोनाबाधितांचे स्वॅब नमुने तपासण्यासाठी घेतले. त्यात काही बाधितांच्या स्वॅबमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे आढळले. राज्यात आढळलेला डेल्टा प्लसचा नवा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या व्हेरियंटचा भाग असल्याचे स्पष्ट झाले. डेल्टा प्लस व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याचे केंद्र सरकारच्या वतीने राज्य सरकारला कळविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्याचे कुंटे यांनी सांगितले. प्रगत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कोरोनाचे नवनवे व्हेरियंट शोधणे सोपे आहे. कोरोनामुक्तीसाठी नवी औषधे प्रभावी असल्याने त्याचा उपचारात समावेश केला जात आहे. रेमडेसिव्हिरच्या चार इंजेक्शनच्या तुलनेत व्हेराफीन एकच मात्रा प्रभावी आहे. मोनोक्लोनल ॲन्टीबॉडी नवे औषधही आले आहे. कोरोनाच्या सुरवातीच्या काळात हे इंजेक्शन रुग्णाला दिल्यास रुग्ण लवकर बरा होतो, अशी माहिती त्यांनी दिली.

 Chief Secretary Kunte
आदिवासी भागात कोरोनावरील उपचारासाठी ‘सुरगाणा पॅटर्न’ प्रभावी


महाराष्ट्र लसीकरणात प्रथम क्रमांकावर

पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरणामध्ये अडथळे निर्माण होत आहेत; मात्र असे असले तरी महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्राकडून लशींचा सव्वाशे कोटी डोसचा साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. जुलै महिन्यात सव्वा लाख डोस प्राप्त होतील. त्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग येईल. सध्या राज्यात दररोज दहा लाख नागरिकांचे लसीकरण केले जात असल्याची माहिती कुंटे यांनी दिली.


(Chief Secretary Kunte instructed to increase the number of oxygen and beds in hospitals)

 Chief Secretary Kunte
पुणे-नाशिक महामार्गावर प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.