ओझर : येथील नवरदेव चांदोरी येथे लग्नाच्या तयारीने जात असतांना हे लग्न बालविवाह आहे, हे समजल्यावर ओझर पोलिसांनी नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली.
परंतु पोलिसांना याची खबर लागली त्यानुसार लग्नासाठी नवरदेवासह जात असलेल्यांना येथें आज दुपारी १ वाजेच्या सुमारास गाडेकर वाडीकडून ओझर उड्डाण पुलाखालून लग्नासाठी जात असणाऱ्या नवरदेवास पोलिसांनी रोखले.
नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच पोलिस घटनास्थळी पोहोचले. कागदपत्रे तपासल्यानंतर १४ वर्षांच्या मुलीचे लग्न तिच्यापेक्षा १४ वर्षे मोठ्या असणाऱ्या मुलासोबत लावून देण्यात येत असल्याचे आढळून आले. (child marriage stopped by Ozar police at chandori Nashik Crime)
ओझर येथील एका बालिकेचा विवाह होणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा पोचला व बालविवाह रोखत पालकांची समजूत काढत वयात आल्यानंतर दोघांचा ठरलेला विवाह करण्यास सांगितले. पालकांनीही त्याला होकार देत झालेली चूक मान्य केली.
पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शना नुसार ओझर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार गरुड साहेब आणि पोलीस उपनिरीक्षक युगेद्रा केंद्रे मॅडम यांनी घटनास्थळी जाऊन आई-वडिलांसह नातेवाइकांची चौकशी करून बालविवाहाचा कायदा सांगत बालविवाह न करण्याचे आवाहन केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.