Childbirth Cost : नॉर्मल डिलिव्हरी 30 तर सिझेरियन 70 हजार! मातृत्व सुखालाही बसताहेत महागाईच्या झळा

Childbirth Cost
Childbirth Costesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : बदलत्या जीवनशैलीमुळे महत्त्वाकांक्षेपोटी आर्थिक स्थैर्यानंतरच आई होण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. त्यातच रुग्णालयावर जीएसटीपासून तर महापालिकेकडून लादला जाणारा कर, भरमसाट विजेचा खर्च मेंटेनन्सवरील खर्चामुळे खासगी रुग्णालयातील प्रसूतीचा खर्च तिपटीने वाढला आहे.

गर्भधारणेपासून औषधी तर प्रसूतीपर्यंतचा खर्च आता लाखाजवळ पोहोचला आहे. खासगी हॉस्पिटलमधील खोली आता हॉटेलपेक्षाही महाग झाली आहे. यामुळे मातृत्व सुखासाठी आई वडील होऊ पाहणाऱ्यांना महागाईच्या झळा जाणवत आहेत. (Childbirth Rates Normal delivery 30 and caesarean 70 thousand Motherhood also affected by inflation nashik News)

आई होण्यासारखा दुसरा आनंद नाही, मात्र आता आई होताना अनेक आव्हाने आहेत. आई होण्याचे वय वाढले असून करिअर आधी ही संकल्पनाही रूढ झाली आहे. पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रसूती घरीच होत असत. काळ बदलला आता संस्थात्मक प्रसूतीची संख्या वाढली. आरोग्य सुविधा वाढल्या, लोक जागरूक झालेत. रूग्णालयीन प्रसूतीचा जन्मदर वाढला.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील अहवालानुसार ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रसूती रुग्णालयात होतात. यापैकी उच्चभ्रूंपासून तर मध्यमवर्गियांतील ३५ ते ४० टक्के प्रसूती खासगी रुग्णालयात होतात.

निफाड तालुक्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये नॉर्मल डिलिव्हरीसाठी सुमारे ३० ते ३५ हजार रुपये खर्च येतो. सिझेरिअनसाठी हाच खर्च ७० हजारांवर जातो. अलीकडे शासकीय रुग्णालयांत प्रसूती करणाऱ्यांची संख्या कमी होत असून खासगी रुग्णालयाकडे अधिक कल आहे. मागील १० वर्षांत नैसर्गिक प्रसूतीपेक्षा सिझेरियनचे प्रमाण झपाट्याने वाढल्याचे दिसते.

नॉर्मल प्रसूती (खासगी रुग्णालय)

- डॉक्टरांची तपासणी- १ हजार रुपये प्रती तपासणी (सहा वेळा) ५ हजार रुपये (पहिल्या तपासणीनंतर कमी फी घेतात)

- अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी ८०० रु. (चार वेळा) ३२०० रु.

- नऊ महिन्यांपर्यंत औषधांचा खर्च आर्यनच्या गोळ्यांपासून इतर औषधी सर्व खर्च ८ हजार रु.

- नॉर्मल प्रसूती - दोन दिवसांचा रूग्णालयीन खर्च २० हजार रुपये.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Childbirth Cost
Onion Price Fall | हल्ले- प्रतिहल्ले थांबवा, कांदा भावाचं बघा! डॉ. सुधीर जाधव यांची भावनिक साद

सिझेरियन प्रसूती (खासगी रुग्णालय)

- डॉक्टरांची तपासणी - १ हजार रुपये प्रती तपासणी (सहा वेळ) १५ हजार रुपये (पहिल्या तपासणीनंतर कमी फी घेतात)

- अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी- ८०० रुपये (चार वेळा तपासणी) ३२०० रुपये

- नऊ महिन्यांपर्यंत औषधांचा खर्च आर्यनच्या गोळ्यांपासून तर औषधांचा सर्व खर्च ८ हजार रुपये

- प्रसूतीच्या वेळी सिझेरियनचा खर्च पाच दिवसांचा खोलीसह रूग्णालयीन खर्च ५० हजार रुपये

"महिलांची बदलती जीवनशैली, आई होण्याचे वाढलेले वय, प्रसूतीदरम्यान वाढलेले वजन यामुळे जोखीम वाढत आहे. औषधांचा खर्च वाढतो, यामुळेच सिझेरियन प्रसूतीची संख्या वाढली. त्यातच वैद्यकीय क्षेत्रावर शासन प्रशासनाकडून लादलेले विविध कर देखभाल दुरुस्तीचा खर्च यामुळे प्रसूतीचा खर्च वाढला आहे. अशाही स्थितीत आम्ही सामाजिक हित जोपासतो. आपत्कालीन स्थितीत रुग्णांना सवलत देतो. काही महिलांची मोफतही प्रसूती करतो."

- डॉ. कविता आहेर, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, पिंपळगाव बसवंत

Childbirth Cost
Onion Crisis : सदाभाऊ, मंत्र्यांना कांदा ज्यूस पाजणार केव्हा? रूई शेतकरी परिषदेतली गर्जना खरी होती की खोटी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()