Nashik News : अभोणा परिसरात टोमॅटोऐवजी मिरचीला प्राधान्य

Wheat flourishing area in tribal western belt. In the second photo, chillies planted on mulching paper at Gosrane.
Wheat flourishing area in tribal western belt. In the second photo, chillies planted on mulching paper at Gosrane.esakal
Updated on

अभोणा (जि. नाशिक) : येथील कांदा उत्पादन परिसरात गेल्या वर्षीच्या तुलनेने १८ ते २२ टक्क्याने गव्हाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मागील काही वर्षांत अवघे पाच टक्के क्षेत्र गव्हाचे होते, तर ९५ टक्के क्षेत्रात सर्वत्र कांद्याची लागवड होती. कांद्याची साठवण क्षमता वाढल्याने बाजारपेठेत मालाची आवकही मोठ्या प्रमाणात राहिली. तसेच इतर राज्यातील कांद्याचे वाढते उत्पादन, निर्यातीबाबतचे धोरण यामुळे कांद्याच्या बाजारभावात अस्थिरता निर्माण झाली. (Chili is preferred instead of tomato in Abhona area Nashik News)

बहुतांशी साठविलेल्या कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर सडलेला कांदा उकिरड्यावर फेकण्याची नामुष्की आली. शिवाय गेल्या वर्षी कांद्याचे रोप टाकलेल्या जागेतही कांद्याचीच लागवड झाली.

त्यामुळे क्षेत्र वाढले. या वर्षी मात्र तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शेतकऱ्यांनी थोडी सावध भूमिका घेत रोपांच्या जागेवर कांद्याऐवजी गव्हाला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. गहू बाजारातून विकत घेण्याऐवजी घरासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी गव्हाचे पीक घेतले आहे. टोमॅटोच्या बाबतीतही शेतकऱ्यांनी मिरचीला अधिक प्राधान्य दिले आहे.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

Wheat flourishing area in tribal western belt. In the second photo, chillies planted on mulching paper at Gosrane.
Nashik News: नायलॉन मांजाच्या खेळातील Red Sky! तब्बल 700 चित्र काढून घरच्या घरीच बनवला ॲनिमेटेड संदेशपट

मागील वर्षी मिरचीला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले. तुलनेने टोमॅटोला अधिक खर्च होऊन योग्य भाव न मिळाल्याने मोठे नुकसान सोसावे लागले. तसेच अवकाळी पावसाचा मोठा फटकाही सहन करावा लागला. त्यामुळे यंदा विविध नर्सरीत टोमॅटोऐवजी मिरचीच्या रोपांना मोठी मागणी दिसते.

"गेल्या वर्षीच्या तुलनेने गव्हाच्या क्षेत्रात १८ ते २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पश्चिम पट्ट्यात शेतकऱ्यांनी नेहमीपेक्षा अधिक बियाणे खरेदी केले. कांद्याऐवजी गहू टाकला आहे. तसेच टोमॅटोला पर्याय म्हणून मिरचीचे क्षेत्रही वाढले आहे.:"

-विनोद पाटील, ओम साईराम कृषिसेवा केंद्र, अभोणा

Wheat flourishing area in tribal western belt. In the second photo, chillies planted on mulching paper at Gosrane.
Winter Disease : वातावरण बदलाचा परिणाम आरोग्यावर; सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजाराने वाढवली चिंता!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.