Chilly Rate News : मिरचीला मिळतोय कवडीमोल भाव! उत्पादन खर्च निघणेही मुश्कील

Red Chillies
Red Chilliesesakal
Updated on

Nashik News : कांदा, टोमॅटोनंतर मिरचीच्या बाजारभावातही घसरण होत असल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

लाखो रुपये खर्च करून मिरचीला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च देखील निघणे मुश्कील झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. (Chilli Rate News Chilly is getting very low price nashik news)

लासलगावजवळील वेळापूर येथील शेतकरी एकनाथ कुटे यांनी एक एकरात ‘आरमार’ जातीच्या मिरचीची लागवड केली होती. त्याकरता त्यांनी सात ते साडेसात हजार रुपये खर्च करून मल्चिंग पेपर व बांबू यासह रासायनिक खते असा एकूण दोन ते अडीच लाख रुपये उत्पादन खर्च केला.

मात्र मिरची निघण्यास सुरवात झाली, तेव्हा बाजारात अवघा १५ ते २० रुपये भाव मिळू लागल्याने ते पुरते निराश झाले आहेत. या भावातून दोन पैसे मिळणे दूरच, उत्पादन खर्च निघणेदेखील मुश्कील झाल्याने कांद्याप्रमाणेच मिरचीलाही वीस ते पंचवीस रुपये किलोला अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी एकनाथ कुटे यांनी केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Red Chillies
Wedding Custom : आधुनिक काळातही लग्नातील शिदोरी प्रथा टिकून

शासनाला दिसत नाही का?

इतके काबाडकष्ट करून पोटच्या पोराप्रमाणे मिरचीचे पीक घेतले, त्याला दहा ते पंधरा रुपये इतका बाजारभाव मिळतोय, मात्र हीच मिरची व्यापाऱ्याकडून घ्यायला गेले तर ६० ते ७० रुपये किलोला मोजावे लागतात.

लाल मिरची पाहिली तर व्यापारी आमच्याकडून दीडशे ते दोनशे रुपये किलोने घेतात. व्यापाऱ्यांकडून आपण मिरची घेतली तर साडेतीनशे चारशे रुपये किलोप्रमाणे विक्री करतात. शेतकऱ्यांची ही पिळवणूक शासनाला दिसत नाही का? यावर काही मार्ग निघणार आहे की नाही असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Red Chillies
Nashik News: तंत्रस्नेही शिक्षक प्रकाश चव्हाण यांच्या स्मार्ट एज्युकेशन FLN Appचे लाँचिंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.