नाशिक : शाळांकडे वळली चिमुकल्‍यांची पावले..!

औक्षण करत, पेढा भरवत विद्यार्थ्यांचे जल्‍लोषात स्‍वागत
औक्षण करत, पेढा भरवत विद्यार्थ्यांचे जल्‍लोषात स्‍वागत
औक्षण करत, पेढा भरवत विद्यार्थ्यांचे जल्‍लोषात स्‍वागतsakal
Updated on

नाशिक : दीर्घ प्रतीक्षेनंतर प्राथमिक स्‍तरावरील शाळा अखेर सोमवार (ता.१३) पासून सुरू झाल्‍या. शहरी, तसेच ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बहुतांश शाळांमध्ये सकाळच्‍या सत्रात प्राथमिक स्‍तरावरील वर्ग भरले. या वेळी काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे औक्षण करत, काही ठिकाणी पेढा भरवत, शालेय बँड पथकाकडून स्‍वागत करत, फुलांची उधळण करत चिमुकल्‍याचे जल्‍लोषात स्‍वागत करण्यात आले.

कोरोनामुळे शालेय शिक्षणाची भिस्‍त ऑनलाइन माध्यमावर होती. प्रादुर्भाव घटत असताना, माध्यमिक व त्‍यापुढील वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली होती. परंतु, सावधगिरीचा उपाय म्‍हणून प्राथमिक स्‍तरावरील वर्ग बंद ठेवण्यात आले होते. वारंवार मुहूर्त हुकलेला असताना, सोमवारपासून अखेर प्राथमिक स्‍तरावरील शाळादेखील सुरू झाल्‍या आहेत.

औक्षण करत, पेढा भरवत विद्यार्थ्यांचे जल्‍लोषात स्‍वागत
राज्यात कोरोनाच्या ५६९ नव्या रुग्णांची भर; ५ जणांचा मृत्यू

मुले लहान असल्‍याने अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना सोडायला त्‍यांचे पालकदेखील शाळेत आले होते. त्‍यांनीही या स्‍वागतोत्‍सवात सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्‍या स्‍वागताची जय्यत तयारी शाळांनी केलेली होती. शालेय प्रवेशद्वाराची सजावट, रंगबिरंगी रांगोळी, वर्गांमध्ये केलेली सजावट लक्षवेधी ठरली. शाळेत प्रवेश करताना मुलांची थर्मल स्‍कॅनिंग व सॅनिटायझर देताना सुरक्षिततेच्‍या विविध उपाययोजना केल्‍या. दुसरीकडे काही ठिकाणी गुलाब पुष्प देत, काही शाळांमध्ये तिळा लावून औक्षण करत या विद्यार्थ्यांचे स्‍वागत करण्यात आले. दरम्‍यान, बस, व्हॅन चालकांचा व्‍यवसायदेखील पूर्वपदावर येऊ लागला आहे.

औक्षण करत, पेढा भरवत विद्यार्थ्यांचे जल्‍लोषात स्‍वागत
नांदेड : मुलांनो शाळेत न चुकता या...सीईओ वर्षा ठाकूर घुगे

काहींमध्ये द्विधा मनःस्थिती

सध्या शाळा सुरू झाल्‍या असल्‍या तरी काही दिवसांतच नाताळनिमित्त सुटी जाहीर होण्याची शक्‍यता आहे. अशात आत्ता मुलांना शाळेत पाठवायचे की नवीन वर्षापासून शाळेला सुरवात करायची, अशी द्विधा मनःस्थिती काही पालकांमध्ये असल्‍याचेही बघायला मिळाले.

पहिली, दुसरीला प्रतिसाद अल्‍पच

प्राथमिक स्‍तरावर तिसरीपासून पुढील इयत्तांतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय राहिली. परंतु, पहिल्‍या दिवशी अनेक शाळांमध्ये पहिली, दुसरीच्‍या विद्यार्थ्यांची संख्या तुरळक राहिली. येत्‍या काही दिवसांत या इयत्तांच्‍या उपस्‍थितीचे प्रमाणदेखील वाढेल, असा विश्‍वास शालेय प्रशासनाकडून व्‍यक्‍त करण्यात आला.

औक्षण करत, पेढा भरवत विद्यार्थ्यांचे जल्‍लोषात स्‍वागत
अकाेला : तीस कोटींच्या १६३ कामांना विघ्नेच फार!

खूप दिवसांपासून शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा होती. ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा येतात. अशात आता शाळा सुरू होत असल्‍याने खूष आहे.

- पुष्कर सोनवणे, इयत्ता चौथी

दोन वर्षांपासून शाळेपासून दूर राहिल्‍याने मैत्रिणी, शिक्षकांशी प्रत्‍यक्ष भेट होत नव्‍हती. आता शाळा सुरू झाल्‍याने सर्वांमध्ये उत्‍साहाचे वातावरण आहे.

- भूमी नागरे, इयत्ता पाचवी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()