State Bank Choupati : स्टेट बँक चौकातील चौपाटी हलविणार

Street Food Trend In 2022
Street Food Trend In 2022esakal
Updated on

नाशिक : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या मागणीनुसार मुंबई- आग्रा मार्गावरील स्टेट बँक चौकातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची चौपाटी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सदर चौपाटी पाथर्डी फाटा येथील हॉटेल गेटवेच्या बाजूला लागून वसविली जाणार आहे. (choupati in State Bank Chowk will be moved to Pathardi Phata nashik news)

राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार महापालिका हद्दीमध्ये हॉकर्स झोन तयार करण्यात आले आहे. सदर २२५ फेरीवाला हॉकर्स घेऊन पैकी ज्या भागात कोणीही हॉकर्स बसत नाही, अशा ठिकाणी फेरीवाला झोन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२०१३ मध्ये फेरीवाला झोन निश्चित करण्यात आले होते, मात्र फेरीवाला झोन निश्चित करताना चुकीच्या पद्धतीने ही निश्चिती करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. महापालिकेने जे फेरीवाला झोन निश्चित केले, त्याऐवजी पारंपरिक पद्धतीने फेरीवाले व्यवसाय करत असल्याचा प्रकार समोर आला होता.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Street Food Trend In 2022
NDA Exam : सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षणाच्‍या अर्जाची या तारखेपर्यंत मुदत; प्रवेशासाठी येथे करा अर्ज..

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहतुकीच्या अनुषंगाने तसेच महामार्गाला लागून असल्याने स्टेट बँक कॉलनी चौकातील चौपाटी हटविण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने फेरीवाला समितीने हा निर्णय घेतला आहे.

Street Food Trend In 2022
Nashik News : गुजरात सरकारची कांदा-बटाटा उत्पादकांना 330 कोटींची मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.