Nashik News: केक, फास्ट फूड सेंटरची तपासणी मोहीम; व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे पालन करावे

नाताळ व नववर्ष स्वागतानिमित्त पार्ट्यांचे आयोजन केले जात असून, तरुण वर्ग फास्ट फूड सेंटरकडे मोठ्या प्रमाणात आकर्षिला जातो, तसेच केकलाही मोठ्या प्रमाणात मागणी असते
Cake Making
Cake Makingesakal
Updated on

सातपूर : नाताळ व नववर्षानिमित्त हॉटेल, केक दुकान, फास्ट फूड सेंटर इत्यादी ठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने ग्राहकांना दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभागामार्फत नाशिक विभागात मोठे हॉटेल्स, केक दुकान, केक उत्पादक, फास्ट फूड सेंटर अशा आस्थापनांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. (Christmas Festival 2023 cake inspection campaign of fast food centers Professionals should follow Food Safety Act nashik)

नाताळ व नववर्ष स्वागतानिमित्त पार्ट्यांचे आयोजन केले जात असून, तरुण वर्ग फास्ट फूड सेंटरकडे मोठ्या प्रमाणात आकर्षिला जातो, तसेच केकलाही मोठ्या प्रमाणात मागणी असते.

या पार्श्वभूमीवर आस्थापनांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, अन्न सुरक्षा अधिकारी, संबंधित कार्यक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त (अन्न) सहभागी होणार आहेत.

तपासणीदरम्यान आस्थापनेने परवाना/नोंदणी घेतली आहे की नाही, कामगारांचे वैद्यकीय तपासणी अहवाल, अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरलेल्या पाण्याचे अहवाल, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले आहे का, स्वच्छता, त्याचप्रमाणे मुदतबाह्य कच्च्या अन्नपदार्थांचा वापर तर होत नाही ना?

Cake Making
Christmas Facts: ख्रिसमस डिसेंबरमध्येच का साजरा केला जातो? कारण आहे खूप खास

आदी बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय हॉटेल्समध्ये पनीर, बटर, खवा, मटण, चिकन, मासे हे चांगल्या दर्जाचे आहेत किंवा नाही, याची सखोल तपासणी करण्यात येणार आहे.

नाताळ व नववर्ष स्वागतासाठी व्यावसायिकांनी ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन त्यांना दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी, तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त सं. भा. नारागुडे यांनी केले आहे.

Cake Making
Christmas 2023 : ख्रिश्‍चन बांधवांचा पवित्र सण ‘ख्रिसमस’ आज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()