नाशिक रोड : नाशिक रोड परिसरात ख्रिसमिसचा म्हणजेच ख्रिस्ती बांधवांच्या सर्वोच्च अशा नाताळ सणाचा उत्साह वाढला आहे.
नाताळ २५ डिसेंबरला असला तरी २४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच नाशिक शहरातील सर्व चर्चमध्ये कार्यक्रमांना सुरवात होणार आहे. (Christmas Festival 2023 Christians will pray for world peace preparations underway in city nashik)
जेल रोडच्या सेंट अण्णा महाचर्चमध्ये बिशप ल्युडस डॅनिअल रविवारी (ता. २४) मध्यरात्री नाताळचा शुभसंदेश देणार आहेत. बिशप हाऊस हे धर्मगुरूंचे मुख्य केंद्र मानले जाते. पाचही जिल्ह्यांतील कॅथलिक चर्च या बिशप हाऊसअंतर्गत सहभागी होतात.
या वेळी फादर पीटर डिसूझा यांच्यासह अन्य धर्मगुरू मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रविवारी रात्री दहाला नाताळ गीत, अकरा वाजता पवित्र मिसा (प्रार्थना) होईल.
२५ डिसेंबरला सकाळी आठला पवित्र मिसा होईल. २६ डिसेंबरला सांस्कृतिक कार्यक्रमात भाविक सहभागी होतील. नाताळनिमित्त बाळ येशू मंदिरात आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली आहे. ख्रिस्त जन्माचा देखावा सादर करण्यात आला आहे.
नाशिक रोडच्या मुक्तिधामसमोर १ मे १९३८ मध्ये सेंट फिलिप चर्चची स्थापना करण्यात आली. तेथे नाताळनिमित्त रविवारच्या मध्यरात्रीपासून आठवडाभर कार्यक्रम होणार आहेत. येथे ख्रिस जीवनावर आधारित देखावे तयार करण्यात आले आहेत.
नाशिक शहर व नाशिक रोड परिसरात ख्रिस्ती बांधवांमध्ये अलोट उत्साह आहे. घरांवर आकाशकंदील लावण्यात आले आहेत. चर्चमध्ये रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. चर्चबरोबरच इंग्रजी शाळांमध्ये ख्रिस्त जन्माचे देखावे करण्यात आले आहेत.
"आम्ही विश्वशांतीसाठी प्रत्येक वर्षी नाताळला प्रार्थना करतो. मानवाचे कल्याण होण्यासाठी आपल्या देशासह जगातील अनेक देशांमध्ये भय आणि द्वेषाचे वातावरण नाहीसे व्हावे, यासाठी ख्रिसमसलाआम्ही प्रार्थना करणार आहोत. हिंसा आणि भीती हे जगण्याचे उत्तर नाही. सर्वांनी प्रेमाने वार्तालाप करावा."- फादर एरोल विवेक फर्नांडिस, प्रमुख धर्मगुरू बाळ येशू तीर्थमंदिर
"ख्रिसमसच्या दिवशी ख्रिस्ती बांधव विश्वशांतीसाठी प्रार्थना करणार आहेत. यासाठी चर्चमध्ये नाताळची तयारी सुरू आहे. इतर समाजातील बांधवांनाही या सणात सहभागी करून सगळ्यांचे कल्याण होण्याच्या दृष्टीने प्रार्थना केली जाते. यासाठी प्रार्थनेसह नाताळ गीत, धर्मगुरूंचा आशीर्वाद आणि धर्मगुरूंना वंदन केले जाते."- वॉल्टर कांबळे, ज्येष्ठ सदस्य, नाशिक कॅथलिक धर्म प्रांत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.