Inspirational News : अवघ्या दोन पाण्याच्या बाटल्यांवर गाठला ‘एवरेस्ट’चा बेस कँम्प; अंगणवाडी सेविकेच्या मुलीची कामगिरी

सर्वसामान्य कुटुंबातील चेतना शर्मा नावाची मुलगी सिडकोच्या एका छोट्याशा घरात राहते. आई अंगणवाडी सेविका आहे.
Mountaineer Chetna Sharma unfurling the tricolor.
Mountaineer Chetna Sharma unfurling the tricolor.esakal
Updated on

Inspirational News : सिडकोतील अंगणवाडी सेविकेच्या मुलीने केवळ दोन पाण्याच्या बाटल्याघेऊन माउंट एव्हरेस्टच्या बेस कँम्पपर्यंत मजल मारली आहे. इव्हरेस्टच्या बेस कँम्पवर तीने डौलाने तिरंगा फडकविल्याने सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील चेतना शर्मा नावाची मुलगी सिडकोच्या एका छोट्याशा घरात राहते. आई अंगणवाडी सेविका आहे. वडील निवृत्त रेल्वे डाक सेवक आहेत. (CIDCO Anganwadi worker daughter climbs Mt Everest nashik news)

दहा वर्षे लहान असलेला भाऊ मुंबईत फुटबॉल कोच म्हणून कार्यरत आहे. चेतनाला गिर्यारोहणाची प्रचंड आवड होती. तिने जम्मू काश्मीरमध्ये मिनिस्ट्री ऑफ डिफेंसच्या अंतर्गत जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटनिंग व अरुणाचल प्रदेशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोर्थ माउंटेनिंग येथे गिर्यारोहणाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण घेतले आहे.

जुलैत हा अभ्यासक्रम पूर्ण करून तिने ‘ए’ ग्रेड मिळविली. ५ सप्टेंबरला तीने प्रवास सुरू केला. तो १४ तारखेला संपला आणि एव्हरेस्टच्या बेस कँम्पवर तिने डौलाने तिरंगा फडकवला. तिथे जाण्यासाठी तिला तब्बल दहा दिवस लागले. परत येताना तीन दिवस लागले.

या मोहिमेसाठी तिला तब्बल एक लाख रुपये खर्च आला. पैकी ९० हजार रुपये तिच्याकडे होते. तर दहा हजार रुपये भावाने मदत केली. पैशांची चणचण असल्यामुळे तीने केवळ दोन पाण्याच्या बाटलीवर हा प्रवास केला. कारण तेथे एका बाटलीची किंमत पाचशे रुपये आहे.

Mountaineer Chetna Sharma unfurling the tricolor.
Jalgaon Inspirational News : ‘तो’ जिद्दीने लढला अन् जिंकाला! एका उच्चशिक्षित तरुणाचा प्रेरणादायी लढा...

याकरिता तिला इंडो- नेपाळ संस्थेचे मार्गदर्शन लाभले. मिळालेल्या मानधनावर तीने एव्हरेस्ट शिखराला जाण्यासाठी खर्च केला. १३ दिवस चाललेल्या या मोहिमेत हवेचा कमी दाब, कमी ऑक्सिजन, दुर्गम रस्ते, पाण्याची उपलब्धता नसणे आदी अडचणी तिला आल्याचे तिने सांगितले.

वाढत्या तापमानाविषयी जागृती

एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोचून पृथ्वीवरील वाढत्या तापमानामुळे हिमनद्या वितळल्याने झालेल्या नुकसानीविषयी लोकांना सांगितले. लोकांना पृथ्वी स्वच्छ करण्याचे आणि वितळणाऱ्या हिमनद्या वाचवता याव्यात यासाठी जास्तीत जास्त झाडे लावण्याचे आवाहन तिने केले.

हा एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करून तिरंगा राष्ट्रध्वज फडकवल्याबद्दल क्रीडा वेध सामाजिक युवा फाउंडेशन नाशिक व अध्यक्ष प्रा. दीपक दळवी, उपाध्यक्ष सुनील आहेर, सचिव प्रा. हेमंत काळे व विविध क्षेत्रातून तिचे अभिनंदन करण्यात आले. चेतना शर्मा या क्रीडा वेध सामाजिक युवा फाउंडेशनच्या खजिनदार असून या संस्थेमार्फत क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करत आहेत.

Mountaineer Chetna Sharma unfurling the tricolor.
Inspirational News : सिक्युरिटी एजन्सीतून मनीषाताईंनी उभी केली ओळख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.