Cidco Shootout Case : सिडकोतील बाजीप्रभु चौकात रविवारी (ता. १६) भरदिवसा भाजपचा पदाधिकारी व सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी याच्यावर गोळीबारप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या रिक्षासह सात-आठ कोयते जप्त केले आहेत.
हल्लेखोरांनी पाळत ठेवून कोष्टीचा खातमा करण्याच्याच उद्देशाने हल्ला चढविला. परंतु, सुदैवाने तो बचावला. तर, हल्लेखोरांना पळ काढावा लागल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे.
मात्र, येत्या काळात शहरात टोळीयुद्धाचा भडका उडण्यापूर्वीच गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. (Cidco Shootout Case Attack on Koshti with intent to murder Crime rickshaw seized with sharp weapons nashik news)
दरम्यान, या हल्ल्यात दोन गोळ्या लागल्याने जखमी कोष्टीवर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गोदाघाटावरील पार्किंग व हप्ता वसुलीतून सराईत गुन्हेगार जया दिवे व राकेश कोष्टी यांच्या टोळीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता.
काही राजकीय नेत्यांनी त्यात मध्यस्थी करत समेटही घडवून आणला होता. परंतु, त्यानंतरही धुसफूस सुरू राहिली अन् त्याचे पर्यावसन रविवारी कोष्टीवरील गोळीबारात झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दिवे व त्याच्या साथीदारांनी कोष्टी याचा खातमा करण्याच्याच उद्देशाने कट रचला.
त्यासाठी संशयितांनी कोष्टीच्या हालचालींवर पाळत ठेवली होती. शनिवारी (ता. १५) रात्रीपासूनच संशयित कोष्टीच्या मागावर होते. रविवारी सकाळी कोष्टी साथीदारासह मोपेडवरून सिडकोतील बाजीप्रभु चौकातून जात असताना, दबा धरून असलेले दोन संशयित दुचाकीवरून आले.
त्यापैकी सागर पवार याने दोन फायरिंग केल्या. परंतु मोपेड चालकाने प्रसंगावधान राखत मोपेड न थांबविता पळ काढला. यामुळे हल्लेखोरांचा कट फिस्कटला.
दिवेला घरातून अटक
कोष्टीवरील हल्ल्याची माहिती मिळताच, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. उमेश गवई (रा. दत्तचौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात मुख्य संशयित जया दिवे, किरण शेळके, विकी ठाकूर, सागर पवार यांच्यासह साथीदारांविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिवे यास त्याच्या राहत्या घरातून अटक केली. तर, विकी ठाकूरलाही अटक केली. दोघांना सोमवारी (ता. १७) न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
हत्यारांसह रिक्षा जप्त
संशयितांनी कोष्टी व त्याच्या साथीदारावर गोळीबार करून जखमी करायचे व त्यानंतर तीक्ष्ण हत्यारांनी वार करून कोष्टीचा खातमा करण्याच्या उद्देशाने रिक्षातून सात-आठ धारदार कोयते आणलेले होते.
पोलीसांनी संबंधीत रिक्षा (एमएच १५, एफयु ०६११) व कोयते जप्त केले आहे. तसेच, किरण क्षीरसागर, गौरव गांगुर्डे या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मुख्य संशयित सागर पवार, किरण शेळके यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके त्यांच्या मागावर आहेत.
राजकीय दबावतंत्र
दरम्यान, याप्रकरणात राजकीय पक्षांच्या काही पदाधिकाऱ्यांकडून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे. संशयित जया दिवे याच्यावर यापूर्वीही सातपूरमधील एका प्रकरणात मोक्काअन्वये कारवाई करण्यात आली होती. परंतु, मोक्का मंजूर न झाल्याने दिवे कारागृहातून बाहेर आला.
आता राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या कोष्टीवर हल्ला केल्याने पुन्हा राजकीय पदाधिकारी या प्रकरणात कठोर कारवाईसाठी दबावाचा वापर करीत असल्याची चर्चा आहे. मात्र, या घटनेमुळे शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे कडवे आव्हान शहर पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.