नाशिक : शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून प्रभाग क्रमांक २७, २५, व २६ ( भागश:) मधील जलकुंभ भरणारी व पाणी वितरणाकरीता ९०० मिलिमीटर व्यासाच्या पीएससी जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
अंबड जवळ ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे बुधवारी (ता. १) सिडकोतील दिवसभराचा पाणीपुरवठा होणार नाही. त्याचप्रमाणे गुरुवारी (ता. २) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. (cidco water supply off tomorrow Nashik Water Management news)
हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
प्रभाग क्रमांक २४ मधील कालिका पार्क, उंटवाडी परिसर, प्रभाग क्रमांक २५ मधील इंद्रनगरी, पवन नगर, माऊली लॉन्स, सावता नगर, त्रिमूर्ती चौक, कोकण भवन परिसर, कामटवाडे गाव व परिसर, प्रभाग क्रमांक २६ मधील मोगल नगर, साळुंके नगर, वावरे नगर,
शिवशक्ती नगर व चौक आयटीआय परिसर, खुटवड नगर, मटाले नगर, आशीर्वाद नगर, संजीव नगर, जाधव संकुल पाटील, पार्क विरार संकुल, प्रभाग क्रमांक २७ मधील अलिबाबा नगर, दातीर वस्ती, अंबडगाव, हुजेफा फर्निचर,
ग्लोबल शाळा व परिसर, प्रभाग क्रमांक २८ मधील लक्ष्मी नगर, अंबड गाव ते माऊली वृंदावन नगर, माऊली लॉन्स परिसर अंबड गाव परिसर, लॉन्स साई, ग्रामनगर, उपेंद्र नगर, महाजन नगर सहावी स्कीम प्रभाग क्रमांक २९ मधील भाद्रपद सेक्टर, आझाद पंछी परिसर, शनि मंदिर परिसर, मोरवाडी गाव व इतर परिसरात पाणी पुरवठा होणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.