Damage Road: डांबरीकरणाच्या ठिगळांमुळे नागरिकांचा संताप; वासननगर भागातील रस्त्यांना अस्तरीकरणाची प्रतिक्षा

A patchy paved road
A patchy paved roadesakal
Updated on

Damage Road : प्रभाग क्रमांक ३१मधील वासननगर आणि आसपासच्या भागात रस्त्यांना डांबराचे ठिगळ लावण्याचा प्रकार सुरू झाल्याने या ठिकाणी पुन्हा अस्तरीकरण होणार नसल्याचे स्पष्ट होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून या भागातील नागरिकांना रस्त्याच्या अस्तरीकरणाची अपेक्षा आहे. मात्र, ना प्रशासन इकडे लक्ष देते ना, आजपर्यंत कोणी लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष दिले. (Citizens angry over asphalted patchy repaired Awaiting resurfacing of roads in Vasannagar area nashik news)

येथील माजी नगरसेवक भगवान दोंदे आणि सुदाम डेमसे यांनी ते स्थानिक असलेल्या पाथर्डी गावाकडे लक्ष दिले. तर चेतनानगर भागात राहणाऱ्या पुष्पा आव्हाड आणि संगीता जाधव यांनी आपल्या भागाकडे लक्ष दिले.

त्यामुळे सातत्याने वासननगरचा हा परिसर दुर्लक्षित राहिला आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिक तीव्र भावना व्यक्त करत आहेत. टोयोटा शोरूमपासून गामणे मैदानाकडे जाताना उजव्या बाजूला असलेल्या या भागातील ही वस्ती २००२ पासून आहे.

मात्र २००३ ला या ठिकाणी जे डांबरीकरण झाले, त्यानंतर आजतागायत डांबर येथील रस्त्यांना लागलेले नाही, असे स्थानिक नागरिक सांगतात. एकीकडे इंदिरानगर, वडाळा आदी भागात दर दोन वर्षांनी चांगल्या स्थितीत असलेल्या रस्त्यांवरदेखील अस्तरीकरण केले जाते.

येथे मात्र आता रस्त्यावर डांबर आहे की नाही हे शोधण्याची वेळ काही ठिकाणी आली आहे. असे असताना आता या ठिगळ लावण्याच्या फंड्याने नागरिकांच्या संतापात अधिक भर पडली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

A patchy paved road
Teacher Transfer : जिल्हा अंतर्गत ऑनलाइन बदल्या पूर्ण; शिक्षक कार्यमुक्तीच्या प्रतिक्षेत

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एकदा या भागात येऊन नागरिकांशी संवाद साधावा म्हणजे त्यांना कळेल की या भागातील रस्ते कधी आणि कशाप्रकारे झाले आहेत. विशेषतः सर्वे क्रमांक ९११ मधील काही रस्त्यांना तब्बल वीस वर्षांची प्रतीक्षा अस्तरीकरणासाठी आहे.

प्रशासनाने तातडीने येथील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी अजय दहिया, संजय म्हस्के, भिला गायकवाड, साहेबराव अहिरे, रवींद्र कदम, राजकुमार गुंजाळ, अनिल दहिया, जगदीश खैरनार, गुरू विधाते,

कैलास पवार, योगेश भामरे, राकेश गांगुर्डे, आबा येवला, योगीराज परखल, रवी गायकवाड, सचिन जाधव, कैलास अग्रवाल, भाऊसाहेब पाटील, विजय सोनवणे, सागर देवरे आदींनी केली आहे.

"गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही रस्त्यांच्या डांबरीकरणाची मागणी करत आहोत. मात्र, कोणीही इकडे लक्ष देत नाही. आसपास सर्वत्र डांबरीकरण सुरू असताना नेमके याच भागात ते का होत नाही, असा प्रश्न सर्व नागरिकांना पडला आहे." - कैलास अग्रवाल, स्थानिक नागरिक

A patchy paved road
Child labor Crime : बाल मजुरी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिस सतर्क! 2 गुन्हे दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.