वागदर्डीत पुरेसा साठा, तरी मनमाडला पाणीबाणी; नागरिकांत अंसतोष

Vaghdardi Dam)
Vaghdardi Dam)Sakal
Updated on

मनमाड (जि. नाशिक) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात (Vaghdardi Dam) साठा कमी असल्याचे कारण पुढे करत पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांनी पाणीबाणी जाहीर केली आहे. मात्र, पुरेसा पाणीसाठा असतानाही १५ दिवसांतून पाणीपुरवठा करण्याच्या फतव्याने नागरिक बुचकळ्यात पडले आहेत, तर दुसरीकडे नगरसेवकांच्या गप्प भूमिकेमुळे जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. (citizens angry over decision to supply water to Manmad city after 15 days)


मनमाडची पाणीटंचाईचे शहर अशी ओळख आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडी भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांनी प्रसिद्धीपत्रक काढत वागदर्डी धरणात कमी पाणीसाठा शिल्लक आणि पालखेडचे पाण्याचे आवर्तन जूनअखेर मिळण्याचे कारण पुढे करत पाणीपुरवठा १५ दिवसांनी म्हणजे महिन्यातून एकदा केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. एकीकडे सत्ताधारी नगरसेवक, तर दुसरीकडे पालिका प्रशासन यामध्ये दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्याधिकारी डॉ. मुंडे यांनी जाहीर केलेले पाणीपुरवठ्याचे वाढीव दिवस नागरिकांच्या मुळावर उठल्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून येत आहेत. मात्र, धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना आणि जूनअखेर पालखेड धरणाचे आवर्तन मिळणार असतानाही पाणीपुरवठ्याचे दिवस का वाढविण्यात आले, याबाबत नागरिकांमध्ये संतप्त भावना आहे. पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे धरणात पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ पालिका प्रशासनाच्या हलगर्जीमुळे सव्वालाख नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याने लोकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. एकीकडे महिलांना एक हंडा पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असताना दुसरीकडे मात्र लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसल्याचे पाहून यासाठीच आम्ही यांना निवडून दिले होते का, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.


मनमाड शहरात दिल्लीपेक्षाही जास्त राजकीय पक्ष व संघटना कार्यरत असून, नको त्या वेळी वेगवेगळी आंदोलने करून जनतेला वेठीस धरले जाते. मात्र, आता पंधरा दिवसांनी शहराला पाणीपुरवठा केला जाणार असतानाही याबाबत कोणीही तोंडातून ब्र शब्द काढायला तयार नसल्याचे पाहून या शहराला कोणी वालीच उरला नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.

Vaghdardi Dam)
Wari 2019 : निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान



पाणीमाफियांमुळे पाणीबाणी…

पंधरा दिवसांनंतर पाणी आल्यानंतर ते पंधरा दिवस वापरावे लागते. त्यामुळे पाण्यात जंतू पडतात. ते पाणी पिण्यायोग्य अथवा वापरण्यायोग्य राहत नाही. परिणामी, पाणी विकत घ्यावे लावते. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याने पाणीमाफिया आणि पालिका प्रशासन यांच्यात काही लागेबांधे तर नाही ना, अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये आहे.
(citizens angry over decision to supply water to Manmad city after 15 days)

Vaghdardi Dam)
नाशिक जिल्ह्यात सोशल मीडियावर हनी ट्रॅपचा धोका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()