Nashik Traffic Problem : दहाव्या मेल वाहतूक कोंडी कधी मिटणार? महामार्गावरील कंटेनर वाहतूकमुळे जाम

मुंबई-आग्रा महामार्गावरील दहावा मैलवर रोज सायंकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत.
A traffic jam at the dahavyamela
A traffic jam at the dahavyamelaesakal
Updated on

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

Nashik Traffic Problem : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील दहावा मैलवर रोज सायंकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. येथे उड्डाणपूल होण्याचे मुहूर्त कधी पूर्ण होणार, असा सवाल वाहनधारकांनी पडला आहे.

मुंबई-आग्रा महामार्ग सर्वांत वर्दळीचा मार्ग असून, देशभरात वाहतूक येथून जाते. (Citizens are suffering from traffic jams in evening on dhavyamela Mumbai Agra highway nashik news)

ओझर विमानतळकडे जाणाऱ्या दहाव्या मैलावर रोजची वाहतूक कोंडीकडे संबंधित प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्याचे दिसते. महामार्गावर असलेल्या चौफुलीवरून दोन्ही बाजूस सायंकाळी क्रॉसिंग सुरू असताना, दोन्ही बाजूने एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा असतात. द्राक्ष, भाजीपाला शेतीची वाहतूक मोहाडीकडून नाशिक, मुंबईकडे होते.

मोठ्या कंटेनरमुळे वाहतूक कोंडी पाहण्यास मिळते. समोरील बाजूस सय्यद पिंपरीकडून सतत वाहनांची सुरू असलेली ये जा अडथळा ठरू आहेत. सबंधित वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न तातडीने सुटावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

A traffic jam at the dahavyamela
Nashik Traffic Problem: ट्रॅव्हल बसमुळे नाशिक रोडला वाहतूक कोंडी

गडकरींनी केली होती उड्डाणपुलाची घोषणा

गेल्या वर्षी नाशिकमध्ये आलेले केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी दहावा मैल येथे उड्डाणपुलाची घोषणा केली होती. मात्र, त्यावर कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. विमानतळामुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्ती जात असल्यास सामान्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथे लवकर उड्डाणपूल बांधवा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अपघातांना बसेल आळा

दहाव्या मैलावर अनेक वेळा छोटे मोठे अपघात होत असतात. यात अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. वाहतूक पोलिसांचे नियंत्रणही कमी पडते. मुख्य महामार्ग सहापदरी आणि दोन्ही सर्व्हिस चारपदरी असल्याने कोणते वाहन कोठून येते, हेच कळत नाही.

A traffic jam at the dahavyamela
Nashik Traffic Problem: शहराला वाहतूक कोंडीचा विळखा! नाशिककरांच्या डोक्याला ताप; जागोजागी वाहतूक कोंडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()