राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाउन असला, तरी हैराण झालेल्या अनेक व्यावसायिकांना मात्र २३ तारखेला जिल्ह्यात निर्बंध शिथिल होण्याची आशा लागून आहे. शनिवारी (ता. २३) काही निर्बंध शिथिल झाले तरी लॉकडाउन कायमच राहणार आहे.
नाशिक : राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाउन असला, तरी हैराण झालेल्या अनेक व्यावसायिकांना मात्र २३ तारखेला जिल्ह्यात निर्बंध शिथिल होण्याची आशा लागून आहे. शनिवारी (ता. २३) काही निर्बंध शिथिल झाले तरी लॉकडाउन कायमच राहणार आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आवर घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २२ मेपर्यंत लॉकडाउनचा निर्णय घेतला. पाठोपाठ राज्य शासनाने ३१ मेपर्यंत लॉकडाउनचा निर्णय घेतल्याने लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढला आहे. आधी जिल्हा आणि त्यानंतर राज्य प्रशासनाने वाढविलेल्या लॉकडाउनमुळे अनेक व्यावसायिक हैराण झाले आहेत. त्यातील अनेकांना २३ मेस जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होण्याची आशा आहे. (Citizens expect some restrictions in Nashik district to be lifted on 23 may)
.
संभ्रम आणि उत्साह
जिल्हा प्रशासनाकडून २३ तारखेला निर्बंध शिथिल होतील, या आशेतून अनेक खेड्यांत उत्साही मंडळींकडून जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात विवाहापासून, तर दुकान सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक खेडेगावांत लॉकडाउनविषयी संभ्रमावस्था आहे.
अशातच कोरोनाची रुग्णसंख्या घटत असल्याच्या बातम्यांमुळे, तर काही भागात उत्साही विवाहांचे नियोजन सुरू असल्याचे वृत्त आहे.
२२ तारखेला निर्णय
लॉकडाउनसंदर्भात शनिवारी (ता. २२) पालकमंत्री फेरआढावा घेण्याची शक्यता आहे. त्यात काय निर्णय होतो, याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. कदाचित निर्बंध शिथिल झाले, तरी पहिल्या अनलॉकदरम्यान उसळलेली गर्दी व त्यातून वाढलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सजग झाली आहे. भलेही निर्बंध शिथिल झाले तरी लॉकडाउन मात्र ३१ मेपर्यंत कायम ठेवून गर्दी होऊ न देण्याबाबत यंत्रणा नियोजन करीत आहे.
२३ मेपर्यंत कडक लॉकडाउन आहेच. कडक लॉकडाउन सुरू ठेवायचा किंवा कसे, याचा निर्णय २२ तारखेला घेतला जाईल. जिल्ह्याचा निर्णय काही जरी असला तरी राज्याचा लॉकडाउन ३१ तारखेपर्यंत आहे व तो नाशिकमध्ये राबविला जाणार आहे.
-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी
(Citizens expect some restrictions in Nashik district to be lifted on 23 may)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.