Nashik News : जुनाट गटारीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; रहिवासी दुर्गंधीमुळे त्रस्त

शहरातील पारेगाव रोडवरील श्री स्वामी समर्थ केंद्र परिसरातील गटार साफ होत नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व रोगराई पसरत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
Citizens of the locality while giving a statement to the Principal about the repair of sewerage in the Swami Samarth Kendra area.
Citizens of the locality while giving a statement to the Principal about the repair of sewerage in the Swami Samarth Kendra area.esakal
Updated on

Nashik News : शहरातील पारेगाव रोडवरील श्री स्वामी समर्थ केंद्र परिसरातील गटार साफ होत नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व रोगराई पसरत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सुमारे २५ वर्षांपूर्वीची ही गटार असून, एकदाही दुरुस्त न झाल्याने सध्या तिची दुरवस्था झाली आहे. (Citizens health is at risk due to chronic sewage nashik news)

नगरपरिषदेने तत्काळ उपाययोजना करून गटारीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शहरातील स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरांची मोठी गर्दी असते, तसेच आजूबाजूला नागरिकांची मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. केंद्रापासून पारेगाव रोडपर्यंत सुमारे दीडशे मीटर अंतरात असलेली गटारीची दुरवस्था झाली असून, गटार तुंबून परिसरात दुर्गंधी येत असल्याने वातावरण खराब होत आहे.

यामुळे डासांचा प्रादुर्भावही वाढला असून, डेंगीसारख्या आजाराची रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. हा परिसर आरोग्यदृष्ट्या रहिवाशांना असुरक्षित वाटत आहे. विशेष म्हणजे हजारो सेवेकरी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी केंद्रात येतात. तेही दुर्गंधी व डासांना वैतागलेले आहेत.

Citizens of the locality while giving a statement to the Principal about the repair of sewerage in the Swami Samarth Kendra area.
Nashik News : थकबाकीदारांवर कठोर कारवाई करा; मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांचे आदेश

सध्या असलेली गटारीला २५ वर्षांच्यावर झाली असून, एकदाही तिची दुरुस्ती केलेली नाही किंवा कोणताही खर्च केलेला नाही. त्यामुळे गटारीची दुरवस्था झाली असून, गटार साफ होत नसल्याने अनेक दिवसांपासून पाणी तुंबले आहे. त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे

परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या हितासाठी गटारीच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर दिलीप ताटे, सोमनाथ ताटे, राजेंद्र ताटे, विजय पोंदे, नारायणमामा शिंदे, बाळासाहेब धांडे, प्रमोद सस्कर, दिलीप मुंदडा, प्रदीप मुंदडा, साकारचंद मंडलेचा, वसंतराव वाईकर, गोविंद खराडे, मुन्ना खर्डे, पी. बी. राठी, प्रकाश भावसार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Citizens of the locality while giving a statement to the Principal about the repair of sewerage in the Swami Samarth Kendra area.
Nashik News : सिन्नरच्या उत्कर्षाचे भगीरथ : (कै.) सूर्यभान तथा नानासाहेब गडाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.