Nashik News : ...अन् अचानक बसथांबा गायब झाल्याने नागरिक आश्चर्यचकित!

इंदिरानगर येथील कलानगर चौकात गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून असलेला बसथांबा अचानक गायब झाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
A tree that has been pruned after removing the bus stand
A tree that has been pruned after removing the bus standesakal
Updated on

इंदिरानगर : इंदिरानगर येथील कलानगर चौकात गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून असलेला बसथांबा अचानक गायब झाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

या ठिकाणी असलेल्या मोठ्या झाडाच्या फांद्यांचीदेखील छाटणी करण्यात आली आहे. या ठिकाणी सिग्नल असल्याने हा चौक मोकळा करण्यासाठी ही कार्यवाही करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले असे समजते. (citizens surprised indiranagar bus stop suddenly disappeared Nashik News)

मात्र, ही धूळफेक असून येथील एका बांधकाम व्यावसायिकाला त्याची इमारत स्वच्छ दिसावी यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे विभाग संघटक ऋषी वर्मा आणि नागरिकांनी केला आहे.

येथील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्याने हा बसथांबा दोघा सिग्नलच्या आतमध्ये येत होता. तो येथून हलविण्याबाबत विचारविनिमय सुरू होता असे समजते. मात्र अचानक तो गायब झाल्याने नागरिकांनी आता शंका उपस्थित करण्यास सुरवात केली आहे.

A tree that has been pruned after removing the bus stand
NMC News : जाहिरात फलक घोटाळ्याची व्याप्ती येणार समोर! महापालिकेचा लाखोंचा महसुल बुडाला

बसथांबा दुसरीकडे बांधायचा होता, तर आधी तो बांधला पाहिजे होता. त्यानंतर जुना हलवायला हवा होता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान या ठिकाणी असलेले झाडदेखील बऱ्यापैकी छाटण्यात आले आहे.

त्याबाबतदेखील नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. तातडीने या भागात नवीन बसथांबा उभा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

A tree that has been pruned after removing the bus stand
NMC News : अनधिकृत 503 धार्मिक स्थळांवरील कारवाई अपूर्ण! महापालिकेचा शासनाला अहवाल सादर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.