Sakal Special : शहर विकास हाच क्रेडाईचा मुख्य केंद्रबिंदू; नाशिकच्या विकासाला अधिक संधी

credai
credaisakal
Updated on

नाशिक : येत्या काळात नाशिकच्या विकासाला अधिक संधी आहे. किंबहुना विकासाचा वेग राज्यात वरच्या स्थानावर राहील. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार नाशिककरांना गुणवत्तापूर्ण व स्वस्तातील घरे देण्याची जबाबदारी मुख्यत्वे पार पाडावी लागेल. (City development is the main focus of CREDAI Krunal Patil said while talking to Sakal newspaper nashik news)

शहराचा विस्तार वाढतं असताना तो सुनियोजित असावा, शहराला बकालपण येवू नये याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. शहर विकास हाच केंद्रबिंदू मानून आतापर्यंत क्रेडाई मेट्रोने वाटचाल केली आहे व भविष्यातही तेच धोरण असेल, असे क्रेडाई मेट्रोचे नवनियुक्त अध्यक्ष कृणाल पाटील यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

बदलत्या गरजांनुसार इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविताना कॅमेरा फुटेजचे बॅकअप संबंधित यंत्रणेकडे हस्तांतरित करण्याबरोबरच इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग व अपारंपरिक सोलर ऊर्जा निर्मितीला प्राधान्य देण्याचे प्रयत्न राहतील, असेही त्यांनी सांगितले. क्रेडाई मेट्रोच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ हॉटेल ताजच्या हिरवळीवर मंगळवारी (ता. ५) पार पडला.

पुढील दोन वर्षांसाठी कृणाल पाटील यांची अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. त्याअनुषंगाने दोन वर्षाच्या वाटचालीबद्दल संवाद साधताना ते म्हणाले, नाशिकच्या विकासाचा वेग सध्या वाढीला लागला आहे. मेट्रो शहराप्रमाणे नाशिकमध्ये मेट्रो निओ प्रकल्प होवू घातला आहे. त्या माध्यमातून शहरांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होणार आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

credai
Market Committee Election : छाननीत 14 अर्ज अवैध : प्रमोद हिले

सुरत- चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गाचा नाशिक जिल्ह्यातून १२२ किलोमीटरचा प्रवास आहे. आडगाव येथे महामार्गाला इंटरचेंज देण्यात आला आहे. त्यामुळे सुरत दोन तासांच्या अंतरावर येणार आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबईच्या वेशीवर दीड तासात पोचता येईल, तर तेथून पुढे आठपदरी महामार्गाने मुंबईत अवघ्या अर्धा तासात पोचता येईल.

भरवीर फाट्यावर बिझनेस सेंटर

समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यात गोंदे फाटा व इगतपुरी तालुक्यात घोटी जवळील भरवीर फाटा येथे इंटरचेंज आहे. त्यामुळे येथे बिझनेस सेंटर उभारले जाणार आहे. समृद्धी महामार्गाला लागून बुलेट ट्रेन चालविण्याचे नियोजन आहे. तसे, झाल्यास नागपूर व मुंबई ही दोन महत्त्वाची शहरे नाशिकला बुलेट ट्रेनने जोडली जातील.

नाशिक- पुणे महामार्गाचे विस्तारीकरण व सेमी हायस्पीड रेल्वेमुळे पुणे शहराचे अंतर कमी होईल. हवाई सेवेचा विस्तार नाशिकच्या विकासाला नवे पंख देणारा ठरत आहे. पायाभूत प्रकल्पांचा विचार केल्यास भविष्यात नाशिकच्या विकासाला मोठी संधी आहे. मुंबई व पुणे येथील विकासाला मर्यादा आल्याने या शहरांच्या मध्यभागी असलेल्या नाशिकला विकासाची अधिक संधी आहे. या संधीचा लाभ नाशिककरांना मिळवून देण्याचे काम क्रेडाई मेट्रोच्या माध्यमातून केले जाईल.

credai
SAKAL Impact : आंदोलनाचा ईशारा देताच नळपाणी पुरवठा योजना सुरु

सीसीटीव्ही फुटेज ट्रिपल ‘सी‘ सेंटरला जोडणार

बदलत्या काळात इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, चार्जिंग पॉइंट व सोलर प्रकल्प ही गरज झाली आहे. या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याला प्रोत्साहन देताना स्मार्टसिटी कंपनीने बॅकअप सांभाळण्याची जबाबदारी घेतल्यास इमारतींच्या सीसीटीव्हीचा बॅकअप स्मार्टसिटीच्या केबलला जोडण्यासाठी सहकार्य केले जाईल. सरकारी यंत्रणा कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवू शकतं नाही. त्याचप्रमाणे पोलिसदेखील शहराच्या प्रत्येक भागात बंदोबस्त पुरवू शकत नाही. त्यामुळे इमारत व कॉलनी अंतर्गत रस्त्यांवर सीसीटीव्ही बसविण्यास प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

अशी आहे नवीन कार्यकारिणी (२०२३-२५)

अध्यक्ष - कृणाल पाटील

मानद सचिव - गौरव ठक्कर

उपाध्यक्ष - दीपक बागड, सुजॉय गुप्ता, जयंत भातंब्रेकर, नरेश कारडा

कोषाध्यक्ष - हितेश पोतदार

credai
Nashik News: बिलोंड्या, सातपायऱ्याच्या डोंगररांगांना आग; बागलाण तालुक्यातील 15 हेक्टर वनक्षेत्र खाक

सहसचिव - सचिन बागड, अनिल आहेर, नरेंद्र कुलकर्णी, ह्रषिकेश कोते

मॅनेजिंग कमिटी - मनोज खिंवसरा , अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणीक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, श्यामकुमार, साबळे, सागर, शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निषित अटल.

निमंत्रित सदस्य - सुशिल बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, करण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा

युथ विंग समन्वयक - शुभम राजेगावकर

युथ विंग सहसमन्वयक - सुशांत गांगुर्डे

महिला विंग सहसमन्वयक - वृषाली महाजन

credai
Nashik News : मेंढपाळांना लागली गावाकडची ओढ! खरीप हंगाम संपल्यावर पुन्हा बाहेरगावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()