Summer Disease : साथीच्या आजारांनी शहर बेजार; घसा खवखवणे, लाल डोळ्यांच्या रुग्णांची वाढती संख्या

Epidemic Disease
Epidemic Diseaseesakal
Updated on

Epidemic Disease : शरीरात गारवा निर्माण करण्यासाठी थंडगार पेय घेताना आता नागरिकांना विचार करावा लागणार आहे. त्याला कारण म्हणजे शहरात घशाच्या आजारांच्या रुग्णांत वाढ होत आहे.

तसेच, वाढत्या उष्म्यामुळे डोळे लाल होत असल्याने विषाणूजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पहिल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण होईपर्यंत या आजारांचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. (city plagued by epidemic diseases Increasing number of patients with sore throat red eyes nashik news)

यंदाच्या उन्हाळ्यात नाशिकमध्ये तापमानाचा पारा अधिक चढलेला दिसून आला. ४०.७ पर्यंत तापमान पोचल्याने नाशिककरांच्या जिवाची लाहीलाही झाली. उष्णतेचा पारा कायम कमी अधिक राहिला. उष्णतेच्या लहरीपणामुळे यंदा अधिक झळ सहन करावी लागली.

पावसाचे दिवस जवळ येत असताना नाशिककरांना वेगळ्याच आजाराने घेरले. सध्या थंडगार पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. थंड पदार्थ सेवन करणाऱ्यांमध्ये युवकांचे प्रमाण अधिक आहे. थंड पदार्थ फ्रीजमध्ये किंवा बर्फात थंड करून ग्राहकांना दिले जातात.

त्यात पुन्हा बर्फ टाकला जातो. कुठल्या पाण्यापासून बर्फ तयार केला जातो याची मोजदाद करता येत नाही, परंतु घसा खवखवण्याचे प्रमाण वाढल्याने वापरला जात असलेला बर्फ चांगल्या प्रतिचा नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

विशेष करून झोपडपट्टी भागात घसा खवखवणे व डोळे येण्याच्या आजाराचा सामना करावा लागते आहे. महापालिकेकडे अशा रुग्णांची नोंद नसली तरी खासगी रुग्णालयात व मेडीकल मधून परस्पर औषधे घेऊन उपचार घेतले जात आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Epidemic Disease
NMC Haj Yatra Vaccination : महापालिकेतर्फे हज यात्रेकरूंचे आजपासून लसीकरण

झोपडपट्टी भागात अधिक रुग्ण

झोपडपट्टी भागात डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. विषाणूजन्य आजार असला तरी सध्या डोळे लाल होण्याचा जो त्रास होत आहे.

त्याला वाढती उष्णता हे एक कारण सांगितले जात आहे. उष्णतेमुळे डोळे लाल होत असल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आला आहे. झोपडपट्टी भागात उष्णतेचे परिणाम अधिक दिसून येतात.

लग्न, धार्मिक समारंभात गर्दी

लग्न, धार्मिक समारंभानिमित्त नागरिक एकत्र येतात. घसा खवखवणे व डोळे येणे यासारखे विषाणूजन्य आजाराचा प्रसार येथूनच मोठ्या प्रमाणात होत असल्याने गर्दी न करण्याचे किंवा संरक्षणात्मक उपाय योजण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

"घसा खवखवण्याचे आजार बर्फापासून होत आहे. तर डोळे लाल होण्याचे प्रकार वाढत्या उष्णतेचे आहे. या आजारांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार असले तरी रुग्ण येत नाही. घरच्याघरी औषधे घेऊन बरे होतात."

- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका.

Epidemic Disease
NMC Drainage Survey : जूनअखेर आराखडा सादर होणार; आयआयटी पवईच्या पथकाद्वारे पाहणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.