नाशिक : लव्ह जिहादसह विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. २८) सकाळी सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनाचाच विसर शहर वाहतूक शाखेला पडल्याने शहरभर वाहतूक कोंडी होऊन त्याचा मनस्ताप वाहनचालकांना झाला. अधिसूचनाच नसल्याने वाहनचालकांनाही आगाऊ सूचना मिळू शकली नाही. त्याचप्रमाणे, मोर्चामध्ये किती मोर्चेकरी सहभागी होतील याचीही माहिती मिळविण्यात आयुक्तालयाची विशेष शाखा फोल ठरल्याने अवघ्या दीडशे कर्मचाऱ्यांच्या बळावर शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले. त्यामुळे ऐनवेळी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडल्याचे दिसून आले. (City police forget about notification Traffic congestion due to hindu muk morcha Nashik News)
मोर्चाची वेळ सकाळची होती. मोर्चा मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करणार होता. यावेळेत उपनगर परिसरातून बहुतांशी नागरिक नोकरी-व्यवसायानिमित्त शहराच्या मुख्य बाजारपेठेत येतात. या मोर्चात तब्बल चार ते पाच हजार मोर्चेकरी सहभागी झाले होते. त्यामुळे मोर्चाचे पहिले टोक मेनरोडला पोचले तेव्हा मोर्चाची शेवटीच बाजू ही शालिमार चौकात होती. यामुळे गंजमाळ सिग्नल, सीबीएस चौक, शालिमार चौक, रेडक्रॉस सिग्नल, रविवारी कारंजा, मेहेर सिग्नलवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. ठिकठिकाणी वाहनचालक, नागरिक मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडली होती. याचा मोठा मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागला.
सायलेन्स झोनचा विसर
जिल्हा व सत्र न्यायालयासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मोर्चाचा समारोप झाला. या ठिकाणी छोटेखानी सभामंडप उभारून स्पीकर लावले. प्रत्यक्षात सदर परिसर झिरो सायलेन्स झोन आहे. असे असतानाही या ठिकाणी स्पीकर लावून भाषणबाजी व घोषणाबाजी करण्यात आल्याने सायलेन्स झोनचे उल्लंघन झाले आहे. यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाकडून परवानगी दिलीच कशी, असा सवाल जागरूक नाशिककरांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??
वाहनांच्या लांबच्या लांब रांगा
मोर्चामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या परिसरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. कामानिमित्त या परिसरात येणाऱ्यांना मोर्चा मार्गाची व वाहतूक वळविल्याची कोणतीही माहिती नव्हती. अशा स्वरूपाचा मोर्चा असेल. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार असेल तर शहर आयुक्तालयामार्फत वाहतूक मार्ग बदलाची आगाऊ अधिसूचना जारी केली जाते. मात्र पोलिस आयुक्तालयाच्या प्रशासनालाच याचा विसर पडल्याने त्याचा मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागला. शालिमार चौक, गंजमाळ सिग्नल, सीबीएस सिग्नल, मेहेर सिग्नल, रविवारी कारंजा, रेडक्रॉस सिग्नल याठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
तुटपुंजा बंदोबस्त
शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली १५० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्तामध्ये सरकारवाडा, भद्रकाली आणि मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. या मोर्चात किती मोर्चेकरी सहभागी होतील याचा अंदाज आयुक्तालयाच्या विशेष शाखेला घेता आला नाही. पोलिसांना मोर्चासाठी दीड ते दोन हजार मोर्चेकरी अपेक्षित होते. प्रत्यक्षात चार ते पाच हजार मोर्चेकरी आल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अवघ्या १५० पोलिस कर्मचाऱ्यांवर बंदोबस्ताचा ताण आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.