Nashik News : शहरासह उपनगरांमध्ये डासांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तसेच भटके कुत्रे, पिण्याच्या पाण्याचा कृत्रिम तुटवड कमी करत नागरिकांना दिलासा देण्याची मागणी सिटूच्या पदाधिकाऱ्यांन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रितेश बैरागी यांना निवेदन देत केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण मोठ्य प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे रात्री शहरातून नागरिकांना जीव मुठीत धरुन चालावे लागते. (City Problems Mosquito infestation in Sinnar city Citizens shocked Nashik News)
त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे तसेच शहरासह उपनगरांमध्ये पाण्याच्या प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे आहे नागरिकांना चार ते पाच दिवसानंतर पाणी मिळत असून त्याचीही वेळ निश्चित नसते.
त्यामुळे महिला भगींनींना पाणी येण्याच्या दिवशी मोबाईल हातात घेवून बसावे लागते. तसेच काही दिवसांपासून शहरातील अवस्छतेमुळे सर्वच ठिकाणी डासांचे प्रमाण वाढले असून डेंग्यू, मलेरिया, टायफाईडसारखे आजार बळावत आहेत.
त्यामुळे तात्काळ शहरात डास् प्रतिबंधक फवारणी सुरु करुन नागरिकांना दिलासा देण्याचीही मागणी य पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावर तात्काळ अंबलबजावणी न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी हरिभाऊ तांबे, गौरव भडांगे, सुरेश नवले, विठ्ठल सोनवणे, बाबू पाबळे उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
वावी वेस ते खंडोबा नाला बंदिस्त गटारींवर झाकणच नाही....
मुक्तेश्वर नगर येथील सिन्नर शिर्डी महामार्गावर असलेल्या शहरातील सांडपाण्याची गटार असल्याने येथील गटारी वरचे सिमेंटचे झाकण अनेक दिवसांपासून फुटलेले असल्याने वावी वेस ते खंडोबा नाला रस्त्याच्या कडेला असलेल्या एकाही बंदिस्त गटारीवर झाकण नसल्याने ही गटार बंदिस्त नसून उघडी पडलेली.
असून यामध्ये अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी ,डास अशा विविध प्रकारच्या रोगराई प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लवकरात लवकर संबंधित विभागाने नगरपालिकेने या गटारी कडे लक्ष देऊन त्या बंदिस्त कराव्या तसेच डासांचे होणारा प्रादुर्भाव हा औषधाने कमी करावा आज अनेक दिवसांपासून डासांचा हा प्रादुर्भाव वाढत असून नगरपरिषद यांकडे लक्ष देते की नाही.
हा एक गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे तरी लवकरात लवकर संबंधित विभागाने डासांचे निर्मूलन करावे अशी मागणी सिन्नर शहरातून होत आहे सायंकाळी सात नंतर घरामध्ये डासांचा उद्रेक होऊन लहान शिशु वर्गाला तसेच ज्येष्ठांना या डासांचा खूप त्रास होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.