Clean Survey Scheme : स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहर सज्ज; सार्वजनिक भिंतींचे सुशोभीकरण

Public Walls
Public Wallsesakal
Updated on

नाशिक : ‘स्वच्छ भारत अभियान- २०२३’ साठी महापालिका सज्ज झाली असून सार्वजनिक ठिकाणच्या भिंतीची रंगरंगोटी करण्याबरोबरच सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

महापालिकेच्या सहा विभागात शौचालये, उड्डाणपूल, शासकीय इमारतींच्या भिंती तसेच वाहतूक बेटाची रंगरंगोटी करण्यात येणार असून प्रारंभी नाशिक रोड विभागातून सुरवात करण्यात आली. (City ready for clean survey scheme Beautification of public walls nashik NMC news)

आत्तापर्यंत २२ ठिकाणी रंगकाम करण्यात आले. सुशोभीकरणाच्या माध्यमातून आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण या विषयांवर घोषवाक्य लिहून जनजागृतीही केली जात आहे. नाशिक रोड विभागात सुमारे १०० ते १२५ ठिकाणी अशाप्रकारे रंगकाम केले जाणार आहेत.

आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचनेनुसार शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर काम सुरू आहे. नाशिक रोड विभागीय कार्यालयाच्या इमारतीवरही स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३ च्या अनुषंगाने जनजागृतीपर घोषवाक्य लिहून सुशोभीकरण करण्यात आले.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Public Walls
Nashik ZP News : गतिमान प्रशासनासाठी तरतुदींचा पाऊस; कर्मचाऱ्यांनाही केले खूश

मुक्तिधाम, बिटको पॉइंट, सोमाणी गार्डन, जेल रोड, नारायण बापू चौक, आम्रपाली झोपडपट्टी, दसक पेट्रोलपंप, दसक गाव शौचालय, ब्लू बेल स्कूल, पंचक शाळा, श्रमिकनगर कॅनॉल रोड, सिंधी कॉलनी, उड्डाणपूल, चेहडी गाव, सिन्नर फाटा, सौभाग्यनगर लॅम रोड, घाडगेनगर आदी ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली.

‘स्वच्छतेची कास धरूया, नाशिक शहराला नंबर वन बनवूया’, विजेचा व पाण्याचा अतिवापर टाळा, ‘चला स्वच्छ सर्व्हेक्षणच्या दिंडीत सामील होऊन शहर स्वच्छ ठेवूया’, ‘सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळा, आरोग्य सांभाळा- पर्यावरणाचे रक्षण करा’, ‘हम सबने ठाना है, भारत को स्वच्छ बनाना है’ अशा आशयाचा मजकूर भिंती रंगवून लिहिण्यात आला आहे.

Public Walls
SAKAL Special : Child Car मुळे तरुणांना रोजगार; खेळणीतील कारमधून शोधले उत्पन्नाचे साधन!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()