Nashik News: सिव्हिलमधील ‘सिटी स्कॅन’ आठवडाभरापासून बंद! संदर्भसेवा रुग्णालयात रुग्णांना हेलपाटे

Civil Hospital
Civil Hospitalesakal
Updated on

Nashik News : जिल्हा शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन मशिन गेल्या आठवडाभरापासून बंद आहे. त्यामुळे विविध उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना सिटी स्कॅन करण्यासाठी शालिमार चौकातील संदर्भसेवा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.

जिल्हा रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू असताना येथील सिटी स्कॅन मशिन आठवडाभरापासून बंद राहते आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था नसते, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, सिटी स्कॅन मशिनच्या क्षमतेपेक्षा अधिक तपासण्या करणे, हेच मुख्य कारण त्यात बिघाड होण्यामागे असल्याचे तंत्रज्ञांनी स्पष्ट केल्याचे समोर येत आहे. (City Scan in Civil closed for week trouble to patients at civil hospital Nashik News)

गेल्या आठवड्यात १२ तारखेला सप्तशृंग गडावरील घाटात गणपती पॉइंटवर वळण घेताना परिवहन महामंडळाची बस थेट ४०० फूट खोल दरीत गेली. या अपघातातील २२ रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

यातील तीन रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांची सिटी स्कॅन तपासणी करणे आवश्यक होते. परंतु, जेव्हा रुग्णांना जिल्हा रुग्णालयात असलेल्या सिटी स्कॅन मशिनकडे नेण्याची वेळ आली, त्या वेळी सदरील मशिन नादुरुस्तीमुळे बंद असल्याचे समोर आले होते.

या घटनेला आठवडाभराचा कालावधी झाला असून, अद्यापही सदरचे सिटी स्कॅन मशिन बंदच आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून उपचारांसाठी दररोज शेकडो रुग्ण येतात. यातील बहुतांश रुग्णांची सिटी स्कॅन करण्याची आवश्यकता असते.

बाहेर खासगी रुग्णालयांत हजारो रुपये सिटी स्कॅनसाठी मोजावे लागतात. मात्र, तेच जिल्हा रुग्णालयात मोफत होत असल्याने शेकडो रुग्णांसाठी मोठा दिलासा होता. परंतु, आठवडाभरापासून सिटी स्कॅन मशिन बंद असल्याने रुग्णांना शालिमार चौकातील संदर्भ सेवा रुग्णालयात जावे लागते.

त्यातही मोजक्याच रुग्णांना पाठविले जात असल्याने अनेक रुग्ण सिटी स्कॅन चाचणीच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे अनेक सर्वसामान्य रुग्णांना मनःस्ताप सहन करावा लागतो. तर, सिटी स्कॅन बंद असल्याने अनेक रुग्णांवरचे उपचारही खोळंबले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Civil Hospital
Nashik Farmers Agitation: शेतकरी संघर्ष संघटनेचे अन्नत्याग आंदोलन; उपोषणाचा 50 वा दिवस

क्षमतेपेक्षा अधिक तपासण्यांमुळे नादुरुस्त

जिल्हा रुग्णालयात २०१७ मध्ये सिटी स्कॅन मशिन तपासणी सुरू करण्यात आली. गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या सिटी स्कॅनमुळे सुमारे ३६ हजार रुग्णांना लाभ झाला. येथील सिटी स्कॅन मशिनची रुग्ण तपासणीची क्षमता प्रतिदिन २० ते २५ आहे.

मात्र, जिल्हा रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून प्रतिदिन ४० ते ६० रुग्णांचे सिटी स्कॅन करण्यात येत होते. त्यामुळे वारंवार सिटी स्कॅन मशिन नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले.

आता तर सदरचे मशिन दुरुस्तीसाठी आलेले तंत्रज्ञ पाच दिवसांपासून दुरुस्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु, अद्यापही त्यांना मशिनमधील ‘फॉल्ट’ शोधता आलेला नाही. यामागे क्षमतेपेक्षा जादा तपासण्या करण्यात आल्याने मशिन नादुरुस्त झाल्याचे सांगितले जाते.

"सिटी स्कॅन मशिन बंद असले, तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी संदर्भ सेवा रुग्णालयातील सिटी स्कॅन रुग्णांची तपासणी केली जाते. नवीन मशिन घेण्याचेही प्रस्तावित आहे. या मशिनचेही दुरुस्तीचे काम सुरू आहे. लवकरच तेही सुरू होईल. रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे."

- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय

Civil Hospital
Nashik News: प्राथमिक आरोग्य केंद्रे जोडली जाणार ‘ई-संजीवनी’शी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()