Gatari Amavasya : ‘गटारी’च्या पार्श्‍वभूमीवर शहरभर पोलिसांची नाकाबंदी

Police Blockade Latest marathi news
Police Blockade Latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : श्रावणमासाला (Shravan) प्रारंभ होण्यापूर्वी मनसोक्त मद्यपान (Drunkards) करणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करीत वाहनचालकांची रात्री उशिरापर्यंत तपासणी केली जात होती. दरम्यान, गुरुवारी (ता.२८) दिवसाही नाकाबंदी केली जाणार आहे. (City wide police blockade on eve of Gatari Amavasya nashik Latest Marathi news)

Police Blockade Latest marathi news
शाळा दुरुस्तीसाठीचे 19 लाख अखर्चित; जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश

शुक्रवारपासून (ता. २९) श्रावणमासाला प्रारंभ होतो आहे. श्रावणात मांसाहार व मद्यपान वर्ज्य केले जाते. त्यामुळे मांसाहार व मद्यपान करणाऱ्यांनी आजपासूनच गटारी साजरी करण्यात प्रारंभ केल्याने शहरातील अनेक हॉटेल्स व परमीट बारमध्ये मद्यपी व खवय्यांची गर्दी दिसून आली.

मात्र, मद्यपान करून वाहन चालविल्याने अपघात होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे पोलिसांनी बुधवारी (ता. २७) सायंकाळपासूनच शहर परिसरात ठिकठिकाणी बॅरिकेटींग करून नाकाबंदी केली आणि दुचाकीस्वार, चारचाकी चालकाची तपासणी केली जात होती.

यावेळी ड्रन्क ॲनड ड्राईव्हचीही कारवाई पोलिसांकडून केली जाणार आहे. सदरची कारवाई पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांसह वाहतूक शाखेचेही पोलिस सहभागी झाले होते. मुंबई नाका, अंबड, इंदिरानगर, सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी, गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करून पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

Police Blockade Latest marathi news
Nashik : आठवडे बाजारात महिलांचे बजेट कोलमडले; जाणुन घ्या कसे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.