Nashik Citylinc News: चालक, वाहकांना मुक्कामाची सोय देणे सिटीलिंक कंपनीला बंधनकारक

Nashik Citylink bus service stopped
Nashik Citylink bus service stoppedesakal
Updated on

Nashik Citylinc News: सिटीलिंक कंपनीच्या गंगापूर गावात मुक्कामी जाणाऱ्या चार बसच्या चालक व वाहकांसाठी रात्रीच्या निवाऱ्यासाठी गंगापूर गावातील बंद असलेली शाळा इमारत विनामूल्य देण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला आहे.

सिटीलिंक कंपनीच्या वतीने बससेवेचा विस्तार करताना आता मुक्कामी बसची देखील व्यवस्था केली जात आहे. गंगापूर गावातून मुंबई किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी सकाळी बसची व्यवस्था आहे. (Citylink Company is obliged to provide accommodation to drivers carriers nashik news)

त्या व्यवस्थेंतर्गत चालक व वाहकांना मुक्कामाची सोय करून देणे सिटीलिंक कंपनीला बंधनकारक आहे. गंगापूर गाव ते नाशिक रोड रेल्वेस्थानक या मार्गावर पहाटे बस धावतात. त्यासाठी डेपोतून बस काढणे व नियोजित स्थानकावर पोचण्यास अडथळा निर्माण होतो.

त्यामुळे बसचालक व वाहकांच्या रात्रीच्या निवाऱ्याची सोय होण्याच्या दृष्टीने सिटीलिंक प्रशासनाने गंगापूर गावातील महापालिकेच्या बंद शाळा क्रमांक ७७ च्या इमारतीची वर्गखोली तात्पुरत्या स्वरूपात मागितली.

Nashik Citylink bus service stopped
Fire Accident: दिवाळीत शहरात 20 आगीच्या घटना; आगीपासून बचाव करण्यासाठी कार्यरत, कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ड्यूटी

परंतु महापालिकेच्या मिळकत विभागाने सिटीलिंकच्या या पत्रावर संपूर्ण शाळा इमारतच सिटीलिंकला उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ७९ (ड) नुसार महापालिकेची मालमत्ता भाडेपट्ट्यावर देण्याची व त्यासाठी निर्धारित दरानुसार शुल्क आकारण्याची तरतूद आहे. असे असतानाही इमारतच सिटीलिंक कंपनीला मोफत दिली जाणार आहे.

Nashik Citylink bus service stopped
World Cup 2023: नाशिककर घेणार क्रिकेटचा ‘आखो देखा’ आनंद; फायनल साठी नाशिकहून अहमदाबाद सेवा फुल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.