Nashik Civil Hospital: सिव्हिल पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे

Civil Hospital
Civil Hospitalesakal
Updated on

Nashik Civil Hospital : जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या असमन्वयाअभावी जिल्हा रुग्णालयाचे नियंत्रण पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे हस्तांतरण करण्यात आले आहे.

आरोग्य सेवा संचालनालयाच्या आधिपत्याखालील जिल्हा शासकीय रुग्णालयाचे हस्तांतरण वैद्यकीय शिक्षण व संशोधन (मुंबई) यांच्याकडे तीन वर्षांसाठी हस्तांतरित करण्यात आले होते. (Civil again to District Surgeon Nashik)

केंद्र शासन व आयुर्विज्ञान आयोगाच्या मान्यतेनुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न ४३० रुग्ण खाटांच्या रुग्णालयास एप्रिल २०२१ मध्ये मंजुरी मिळाली होती.

या रुग्णालयाचे बांधकाम सुरु असेपर्यंत तीन वर्षांसाठी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागास तात्पुरत्या स्वरूपात वापरासाठी देण्यात आले होते. तसा सामंजस्य करारही करण्यात आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Civil Hospital
SPPU: अमृत महोत्‍सवानिमित्त सुचवा पुणे विद्यापीठाला बोधचिन्‍ह; प्रवेशिका पाठविण्यासाठी 17 ऑगस्‍टपर्यंत मुदत

परंतु, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स व जिल्हा रुग्णालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये असमन्वयाअभावी सातत्याने वादाचे प्रसंग निर्माण झाले होते. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी महाविद्यालयीन अधिष्ठातांकडे रुग्णालयाचे हस्तांतरण पुन्हा मागितले होते.

त्यासंदर्भातील प्रस्तावही आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडे दिला होता. त्याची दखल घेत तीन वर्षांसाठी केलेला सामंज्यस करार संपुष्टात येईपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सकांचे रुग्णालयावर नियंत्रण राहणार आहे.

महाविद्यालय हे जिल्हा रुग्णालयाशी संलग्न राहण्यास मान्यता दिली असून त्यासंदर्भात शासनाचे अवर सचीव क. प्र. पिसे यांनी आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सकांना कळविले आहे.

Civil Hospital
Nashik ZP News: जि. प. चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, आनंद पिंगळे यांची बदली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.