Nashik MPSC Interview Date : राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२२ मधील उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रियेला सुरवात होत आहे.
राज्यातील तीन शहरांमध्ये मुलाखत घेण्याचे नियोजन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केले. त्यानुसार नाशिकमध्ये मंगळवार (ता. ५)पासून मुलाखत प्रक्रियेला सुरवात होईल. (Civil Service interview to Nashik from 5 december news)
कोरोना महामारीमुळे स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यामुळे २०२२ च्या नियोजित परीक्षांची प्रक्रिया अद्यापही पूर्ण होऊ शकलेली नाही. परिस्थिती पूर्वपदावर आलेली असताना आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जलद गतीने प्रक्रिया राबविली जात आहे. पूर्व परीक्षेतून राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२२ ला पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
लेखी परीक्षा व मुलाखत यांच्यातील कामगिरीच्या आधारे अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. निवड अंतिम टप्प्यात आलेली असल्याने उमेदवार सध्या मुलाखतीच्या तयारीत व्यस्त दिसतात.
त्यासाठी शिक्षक, शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन अनेक उमेदवार घेत असल्याचेही पाहायला मिळत आहे.
असे आहे मुलाखतींचे नियोजन
आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार गुरुवारी (ता. ३०) व शुक्रवारी (ता. १) असे दोन दिवस आणि ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत नवी मुंबईमधील सीबीडी बेलापूर येथील आयोगाच्या कार्यालयात मुलाखती घेतल्या जातील. तसेच, ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथेही मुलाखती घेतल्या जाणार आहेत. एकूण एक हजार १६८ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.