Nashik Crime : शहरातील रौनकाबाद भागात सोशल मीडियावर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीकाटिप्पणी केल्याने सादिक शेख समशेर व रशीद शेख बशिर या दोघांच्या गटात तुफान हाणामारी झाली.
या हाणामारीमध्ये सात जण जखमी झाले. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका गटातील दहा संशयितांना अटक केली आहे. (Clash between 2 groups in Malegaon 7 people injured Nashik Crime)
सादिक शेख (वय ५८, रा. रौनकाबाद, गल्ली नं. ७) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की मजहर शेख राशीद हाजी (वय १९), भुरु शेख नजमुद्दीन, अश्पाक राशीद हाजी, अनिस खजुरवाला, आमीन शेख राशीद, अशरद शेख राशीद,
तौहसीक शेख राशीद, मारुफ शेख, शेख काशीद रशीद (वय २५, सर्व रा. रौनकाबाद), जहीर हाजी नजमुद्दीन (रा. गुलशनाबाद) आदींसह १५ जणांनी सादिक शेख यांच्यासह मुलगा सरफराज शेख, साजिद शेख यांच्या उजव्या हातावर कोयत्याने वार केले तर उर्वरित संशयितांनी दगडफेक केली. याप्रकरणी दहा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
याउलट रशिद शेख (वय ५०, रा. रौनकाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले, की रशीदचा मुलगा मजहर यास शेख शरजिल सादिक, शेख शेहजाद सादिक, शेख अरबाज सादिक, शेख फरदिल सादिक, शेख युसुफ सादिक, शेख बाबा रेतीवाला व शेख समीर युसूफ यांनी लाकडी दांड्याने मारहाण केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शेख रशीद हे सोडविण्यास गेले असता युसूफने बेसबॉलच्या दांडक्याने त्यांच्या छातीवर, पाठीवर, पोटावर, डोक्यावर मारहाण केली. बाबा शेखने तलवार दाखवून खून करण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपअधिक्षक तेगबीरसिंग संधू, पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे, उपनिरीक्षक ए.ए.शेख यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.