Nashik News : कसबे सुकेणे (ता. निफाड) येथील अवैध धंदे तत्काळ बंद करावेत या मागणीवरून कसबे सुकेणे ग्रामसभेत ग्रामस्थ व पोलिस यांच्या खडाजंगीने ग्रामसभा चांगलीच गाजली. सरपंच आनंदराव भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत विविध विषयांसह चर्चा झाली.
मागील आठवड्यात झालेल्या दोन गटातील हाणामारीनंतर दोन दिवस कसबे सुकेणे बंद होते. गावातील अवैधधंदे तत्काळ बंद करा या मागणीवरून ग्रामस्थ पोलिसांच्या भूमिकेबाबत चांगलेच आक्रमक झालेले होते.
गावात अवैध धंदे सुरू असल्याची प्रतिक्रिया अनेक ग्रामस्थांनी दिली. पोलिस प्रशासनाकडूनही अवैध धंद्यांची माहिती दिल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. (Clash between police and villagers over illegal business Expressed anger that person responsible for riots not arrested Nashik News)
मागील आठवड्यात दोन गटातील हाणामारीमुळे गावातील ऐक्याला तडा गेला असून अद्यापही घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींना अटक का केली नाही असा प्रश्न विचारण्यात आला. पोलिसांकडून मात्र संशयित फरार असून त्यांच्या मार्गावर पोलिस असून त्यांना अटक केली जाईल अशी ग्वाही दिली.
याशिवाय या ग्रामसभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, कृषी विभागाचा आढावा सादर करणे, MSEB विभागाचा आढावा सादर करणे, पशुसंवर्धन विभागाचा आढावा सादर करणे, आरोग्य विभागाचा आढावा सादर करणे,
दशक्रिया विधी शेड/ संरक्षण भिंत/ गंधमुक्ती शेड बांधण्याबाबत चर्चा करणे, शासकीय जागा/ ग्रामपंचायत मालकीच्या जागा मोजणी करणे, फेरआकारणीस मंजुरी घेणे, स्टॅन्डवरील गाळेच्या पोटभाडेकरू बाबत चर्चा करणे/नवीन आकारणी करणे,
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
वार्षिक अहवालास मंजुरी घेणे, MREGS, रमाई/ शबरी/ यशवंतराव चव्हाण NT वैयक्तिक लाभाचे लाभार्थी निवड करणे, १५ वा वित्त आयोग आराखडा तयार करणे या विषयांवरही चर्चा करण्यात आली.
ग्रामसभेसाठी सरपंच आनंदराव भंडारे, उपसरपंच शीतल नळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कल्याणी उगले, सोनाली घोरपडे, निर्मला भोईर, संग्राम भंडारे, अनुपमा जाधव, प्रवीण पाटील, ललित कर्डक, शरद भंडारे, रामभाऊ डंबाळे, सोमनाथ भागवत, सुरेखा औसरकर, राजेंद्र देशमुख, अंजना पावडे, शीतल भंडारे, असिफा पिंजारी, माधुरी जाधव, ग्रामसेवक रवी अहिरे, ग्रामपंचायत कर्मचारी, कसबे सुकेणे पोलिस प्रशासन व ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.