Nashik News : ‘स्वच्छ शहर’ स्पर्धेत आरोग्य विभागाची कसोटी; पथक शहरात दाखल

swachha bharat abhiyan
swachha bharat abhiyanesakal
Updated on

Nashik News : स्वच्छ भारत अभियानामध्ये सातत्याने मानांकन घसरत असताना नव्या सर्वेक्षणामध्ये वरचा क्रमांक मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाची कसोटी सुरू झाली आहे.

केंद्र सरकारचे स्वच्छ सर्वेक्षण पथक शहरांमध्ये दाखल झाले असून, मलनिस्सारण केंद्रांबरोबरच घनकचरा व्यवस्थापन, शाळा, उद्याने, वाहतूक बेटे, फुटपाथ तसेच प्रभागनिहाय पाहणी सुरू करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस सर्वेक्षण सुरू राहील. (Clean survey team of central government entered city nashik news)

मागील चार वर्षांपासून केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. अभियानाअंतर्गत देशभरातून स्वच्छ शहरांची यादी जाहीर केली जाते. त्यातून शहराला मानांकन देऊन स्वच्छतासंदर्भात असलेल्या परिस्थितीची जाणीव करून दिली जाते. काही वर्षांपासून महापालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण मानांकन सातत्याने घसरत आहे.

त्यामुळे राज्य शासनाबरोबरच महापालिका प्रशासनानेदेखील वरचा क्रमांक मिळविण्यासाठी अनेक आश्वासन नाशिककरांना दिली. त्याचबरोबर नाशिककरांनीदेखील स्वच्छ सर्वेक्षणाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने शहरभर स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविण्यात आले. आता त्या उपक्रमांच्या अनुषंगाने मानांकन देण्यासाठी केंद्र सरकारचे पथक शहरांमध्ये आहे. जानेवारीत सर्वेक्षण केले जाते, परंतु यंदा सहा महिने विलंबाने पथक दाखल झाले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

swachha bharat abhiyan
Nashik Farmer Helpline : शेतकऱ्यांसाठी ‘बळीराजा’ हेल्पलाईन; ग्रामीण पोलिस दलाचा उपक्रम

स्वच्छतेची पाहणी

केंद्र सरकारकडून शहरात दाखल झालेल्या पथकाच्या माध्यमातून ओला व सुका कचरा विलगीकरण, निवासी व व्यावसायिक भागातील स्वच्छतेची परिस्थिती, प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी व सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया, टाकाऊ बांधकाम साहित्याची विल्हेवाट, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण, उद्याने व शाळांमधील स्वच्छता तसेच महापालिकेकडून जनजागृती विषयक करण्यात आलेली जनजागृती या बाबींचे सर्वेक्षण केले जात आहे.

या विषयांना मिळणार गुण

- सर्व्हिस लेव्हल प्रोग्रॅम- ४५२५

- सिटीझन फीडबॅक- २,४७५

- प्रमाणपत्र- २,५००

सिटीझन फीडबॅक ठरणार महत्त्वाचा

यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणात महापालिकेचे मानांकन घसरण्यामागे सिटीझन फीडबॅक कमी पडला होता. याचाच अर्थ नाशिककरांनी हिरिरीने उपक्रमात सहभाग घेतला नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता नागरिकांचा सहभाग नोंदविणे महत्त्वाचे ठरणार आहे. या कॅटेगिरीमध्ये अधिक गुण मिळाल्यास महापालिकेचे मानांकन उंचावू शकते.

swachha bharat abhiyan
Nashik ZP News : फायलींवरील टिपण सुलभपणे लिहावे; सहाय्यक व कनिष्ठ अधिकाऱ्यांना कामकाजाचे प्रशिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.