रोबोटद्वारे ड्रेनेजलाइनची स्वच्छता; शहराच्या विविध भागात प्रात्यक्षिक

Robot Demonstration & nmc workers
Robot Demonstration & nmc workersesakal
Updated on

जुने नाशिक : अत्याधुनिक तंत्र प्रणालीचा (Sophisticated technology system) उपयोग करून यापुढे ड्रेनेज पाइपलाइनची (Drainage Pipeline) स्वच्छता होणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून (NMC) बॅन्डीकूट रोबोटचा (Bandicoot robot) वापर करण्यात येणार आहे. यामुळे वेळेची बचत तर होणार आहेच, याशिवाय जीवितहानी टळण्यास मदत होणार आहे. ड्रेनेज पाइपलाइन स्वच्छता करताना विषारी गॅसने गुदमरून कर्मचाऱ्यांना प्राण गमवावा लागल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. (Cleaning of drainage line by robot Demonstration in different parts of city Nashik News)

अशा घटनांना आळा घालण्यासाठी, तसेच कमी वेळेत अधिक काम आणि कमी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामे पूर्ण करून घेण्याच्या निमित्ताने महापालिकेकडून अत्याधुनिक तंत्र प्रणालीचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. स्मार्टसिटीअंतर्गत शहरातील सर्वच ड्रेनेजलाइन भूमिगत केल्या जात आहे. वारंवार रस्ते खोदून ड्रेनेज लाईन स्वच्छ करणे शक्य नाही. स्मार्टसिटी ब्रीद कायम ठेवत वेळेत कामे होण्यासाठी महापालिका बॅन्डीकूट रोबोट वापर करण्यास विचाराधीन आहे. रोबोटच्या हायड्रोलिक प्रणालीद्वारे विनाकर्मचारी ड्रेनेजलाइन आणि चेंबरची स्वच्छता केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच रोबोट खरेदी केला जाणार आहे.

Robot Demonstration & nmc workers
HSC Result : गवंडी काम करणारा विद्यार्थी जेंव्हा बारावी पास होतो...

तत्पूर्वी रोबोट कशा पद्धतीने काम करेल, त्याची कार्यक्षमता कशी असेल, त्यातून कशा पद्धतीने कामे साध्य होऊ शकतील. याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी महापालिका अधिकारी कर्मचारी आणि रोबोट तयार करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ७) शहराच्या विविध भागात प्रात्यक्षिक केले. सकाळी वडाळा नाका परिसरातील वजन काटा भागातील ड्रेनेज आणि चेंबरची स्वच्छता करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. बॅन्डीकूट रोबोटचा वापर केल्यास ड्रेनेज आणि चेंबरच्या तळात असलेला मळ, कचरा रोबोटच्या हायड्रोलिक पद्धतीने स्वच्छ केला जाणार आहे. चेंबरमध्ये कर्मचाऱ्यांनी उतरणे, स्वच्छता करत असताना श्वास गुदमरणे, जिवावर बितने असे सर्व प्रकार टळणार आहे. या वेळी महापालिकेचे अभियंता गणेश मैद, आर. एम. शिंदे, उपअभियंता श्री. पालवे, एजाज काझी, श्री. गुंजाळ, रवी पाटील, श्री. जगताप, श्री. पवार, श्री. कोकणे आदी उपस्थित होते.

Robot Demonstration & nmc workers
देशात 50 अन् राज्यात 71 टक्के घरांमध्ये नळ कनेक्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.