Nashik News : संत निरंकारी मिशनतर्फे गोदावरीची स्वच्छता; तीनशेच्यावर स्वयंसेवकांची मदत

Garbage removed from Ramtirth Godavari river by volunteers of Sant Nirankari Mission.
Garbage removed from Ramtirth Godavari river by volunteers of Sant Nirankari Mission.esakal
Updated on

सिडको (जि. नाशिक) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संत निरंकारी मिशनतर्फे देशभर राबविण्यात येत असलेल्या अमृत परियोजनेअंतर्गत देशभरातील सुमारे एक हजार १०० पेक्षा अधिक ठिकाणी ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियान राबविण्यात आले.

स्वच्छ जल आणि जल रक्षणाच्या प्रति समर्पित असलेल्या या परियोजनेतंर्गत गोदावरी नदीच्या तीरावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. (Cleaning of Godavari by Sant Nirankari Mission Over 300 volunteers helped Nashik News)

सद्गुरू माता सुदीक्षा महाराज यांनी पाण्याच्या मनाच्या शुद्धतेचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच पाण्याची बचत करण्याविषयी मार्गदर्शन केले. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी संत निरंकारी मिशनच्या सुमारे साडे तीन लाख स्वयंसेवकांनी भाग घेतला होता.

या परियोजनेच्या अंतर्गत नाशिकचे तिर्थक्षेत्र असलेल्या गोदावरी नदी तसेच, यशवंतराव पटांगण, टाळकेश्वर मंदिर, रामतीर्थच्या दरम्यान नदीच्या चार पात्रात तसेच, त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्ता व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली.

या अभियानाच्या वेळी महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विजयकुमार मुंढे, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड, स्वच्छता निरिक्षक संजय दराडे, कल्पना पांडे आदींनी भेट देत स्वयंसेवकांचा उत्साह वाढवला.

Garbage removed from Ramtirth Godavari river by volunteers of Sant Nirankari Mission.
Crosscountry Bicycle Ride : नाशिकच्या डॉ. मुस्तफांच्या नेतृत्वात दिल्ली ते काठमांडू राइड केली सर

गोदावरीच्या संपूर्ण परिसरात साफसफाई

यंदा सद्गुरू माता सुदीक्षा यांच्या सूचनेनुसार ‘स्वच्छ जल व जल संरक्षणाच्या दिशेने मिशनद्वारे एक सार्थक पाऊल टाकण्यात आले आहे. पर्यावरण संतुलन, प्राकृतिक सौंदर्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून राबविण्यात येत असलेल्या या परियोजनेला क्रियात्मक रूप देऊन आपल्या या सुंदर धरतीचे नुकसान होण्यापासून बचाव करू शकतो.

तीनशेच्यावर निरंकारी सेवेकरी तर शंभरावर सेवादल बांधवांनी गोदावरी नदीत पडलेला कचरा, शेवाळ, निर्माल्य, पानवेली काढल्या. तर संपूर्ण परिसरात साफसफाई करण्यात आली. यात ८०५ किलो निर्माल्य तसेच, तत्सम कचरा व राडारोडा पाच टन जमा करण्यात आला. कचरा उचलण्यासाठी मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यासाठी घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.

उगम स्वच्छ तर पुढचा प्रवाह निर्मळ : मुंडे

या अभियानात निरंकारी मिशनचे क्षेत्रीय प्रभारी जनार्दन पाटील यांनी भेट देऊन सहभाग नोंदविला. या प्रसंगी उपायुक्त श्री. मुंडे म्हणाले, गोदावरी ही जीवन वाहिनी आहे. तीचा उगम नाशिकमधून आहे.

उगम स्वच्छ झाला तर पुढचा प्रवाह निर्मळ झाल्याशिवाय राहणार नाही. निरंकारी मिशनने एक चांगली चळवळ उभी केली असून नागरिकांनीही सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तर आरोग्य अधिकारी डॉ. पलोड यांनी मिशनचे आभार व्यक्त करीत ही प्रत्येकाची जबाबदारी असून सर्वांनी अशा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

नाशिकचे सेक्टर संयोजक गुलाब पंजवाणी यांनी मिशनच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी राजन आमले, बाळासाहेब आहिरे, नागेंद्र विश्वकर्मा आदी उपस्थित होते.

Garbage removed from Ramtirth Godavari river by volunteers of Sant Nirankari Mission.
BJP Booth Campaign: विधानसभेत दोनशे प्लस जागांचे लक्ष्य : विजय चौधरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.