Nashik News : शहरातील 159 झोपडपट्ट्यांत आजपासून स्वच्छता अभियान

cleanliness
cleanliness esakal
Updated on

Nashik News : स्वच्छतेची संकल्पना झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहचावी या उद्देशाने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात स्वच्छ, सुंदर झोपडपट्टी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील १५९ घोषित झोपडपट्ट्यांमध्ये मंगळवार (ता. २५)पासून १५ मेपर्यंत हे अभियान राबविले जाणार आहे. (Cleanliness campaign in 159 slums of city from today Nashik News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

cleanliness
RTE Admission : आरटीई प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशास 8 मे पर्यंत मुदतवाढ

स्वच्छता अभियान राबविलेल्या पहिल्या तीन स्वच्छ झोपडपट्ट्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविले जाणार आहे. स्वच्छता अभियानाबरोबरच गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठीदेखील महापालिकेच्या गोदावरी संवर्धन कक्षामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत.

अभियानात घोषित झोपडपट्ट्यांमधील मुलभूत सेवा-सुविधांचा आढावा घेणे, स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाणार आहे. ओला व सुका कचरा विलगीकरण, सांडपाणी भूमिगत गटारीद्वारे सोडणे या बाबी ध्यानात घेतल्या जाणार आहेत. अहवाल प्राप्तीनंतर स्वच्छ झोपडपट्टी पुरस्कार दिला जाणार आहे.

cleanliness
Goat Farming Workshop : बंदीस्त शेळी-मेंढीपालन' यशस्वीतेचा मिळवा मंत्र; नाशिकमध्ये एकदिवसीय विशेष कार्यशाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.