Nashik News : मीनाताई ठाकरे उद्यानात स्वच्छता मोहीम; उद्यानातील खेळण्यांची लवकरच दुरुस्ती!

Workers cleaning in Meenatai Thackeray Park.
Workers cleaning in Meenatai Thackeray Park.esakal
Updated on

सिडको (जि. नाशिक) : परिसरातील (स्व.) मीनाताई ठाकरे उद्यानाची दुरवस्था झाल्याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसारित झाल्यानंतर उद्यान विभागाकडून उद्यानात स्वच्छता मोहिमेस सुरवात करण्यात आली आहे. उद्यानातील खेळणी लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे आश्वासन मनपा प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आले आहे. (Cleanliness drive in Meenatai Thackeray Park Park toys repair coming soon Nashik News)

सिडको परिसरातील उद्यानाच्या दुरवस्थेबाबत नाशिक महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत उद्यानातील केरकचरा जमा करून तो लागलीच घंटागाडीमध्ये रवाना करण्यात आला आहे.

तर उद्यानातील तुटलेल्या साहित्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करून किंवा नव्याने साहित्य टाकण्याचे आश्वासन दिल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. उद्यानामध्ये सुरू असलेल्या प्रेमीयुगुलांचा वावर थांबवण्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

सिडकोतील अनेक उद्यानामधील प्रेमीयुगुलांचा त्रास हा कळीचा मुद्दा बनला आहे. यावर त्वरित उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी आता स्थानिक रहिवाशांमधून जोर धरू लागली आहे.'

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

Workers cleaning in Meenatai Thackeray Park.
Nashik News : अतिक्रमित भूखंडाचा वाद उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारात

"‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसारित झाल्यानंतर उद्यानाच्या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. उद्यानाची स्थिती कायमस्वरूपी अशीच राहो, एवढीच अपेक्षा बाळगतो."
- सोनम जयस्वाल, गृहिणी

"उद्यानाची दुरुस्ती सुरू झाल्याने समाधान असले तरी येथे असलेली विद्युत डीपीला संरक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. उद्यानातील प्रेमीयुगुलांचा वावरदेखील कमी झाला पाहिजे."
- अस्मिता पाटील, गृहिणी

Workers cleaning in Meenatai Thackeray Park.
Nashik News : मान्यतेच्या पडताळणीसाठी शिक्षणची समिती नाशकात!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()