Cleanliness Drive: ‘स्वच्छता हीच सेवा'! शहरात विविध ठिकाणी ‘एक तारीख, एक तास स्वच्छता’ मोहीम

Manisha Vispute, Principal of Adarsh ​​Vidya Mandir, on the occasion of cleanliness drive at Nashik Road Railway Station
Manisha Vispute, Principal of Adarsh ​​Vidya Mandir, on the occasion of cleanliness drive at Nashik Road Railway Stationesakal
Updated on

Cleanliness Drive : महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.१) शहर आणि उपनगरांमध्ये महापालिका, स्वयंसेवी संस्था, शाळा यांच्यातर्फे ‘एक तारीख, एक तास’ उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. (Cleanliness Drive One Date One Hour Cleanliness campaign at various places in city nashik nmc)

शहरातील महापालिकेच्या सर्व ३१ प्रभागांत व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, शाळा अशा एकूण ६१ ठिकाणी राबविण्यात आली. परिसर स्वच्छता करुन जमा झालेला कचरा घंटागाडीद्वारे खतप्रकल्प येथे पाठविण्यात आला.

या मोहिमेसाठी शहरातील नवीन नाशिक विभागातील प्रभाग २८ मध्ये आमदार सीमा हिरे उपस्थित होत्या. तसेच इतर विभागातही विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, मनपाचे उपायुक्त लक्ष्मीकांत सताळकर, डॉ. विजयकुमार मुंडे, श्रीकांत पवार, प्रशांत पाटील, नितीन नेर, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. आवेश पलोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण, शिक्षण अधिकारी बी. टी. पाटील, कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांसह विभागीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील स्वछता मोहिमेत रोटरी क्लब, पारिक सेवा संघ, रामकृष्ण मिशन, बँक ऑफ महाराष्ट्र, क्वालिटी सिटी नाशिक, एनएनसी कॅडेट्स, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी इंडियन ऑईलचे व ताज हॉटेलचे अधिकारी,कर्मचारी विविध खासगी संस्थेचे पदाधिकारी व नागरिक असे सर्व साडेअकरा हजारांवर स्वयंसेवक सहभागी झाले.

फडोळ मळ्यात आमदार हिरेंकडून स्वच्छता मोहिमेसह जनजागृती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक २८ मधील फडोळ नगर परिसरातील स्वच्छता मोहिमेमध्ये आमदार सीमा हिरे यांनी सहभागी होऊन स्वच्छता मोहीम जनजागृती अभियान राबविले.

यावेळी नवीन नाशिक विभागीय अधिकारी मयूर पाटील, माजी नगरसेविका प्रतिभा पवार, भाजप मंडलाध्यक्ष अविनाश पाटील, भाजप युवा नेत्या रश्मी हिरे, तसेच भाजप शहर व मंडल पदाधिकारी महेंद्र पाटील, शरद फडोळ, प्रशांत कोतकर, डॉ. विनय मोगल, वैभव महाले, मनपा स्वच्छता कर्मचारी उज्ज्वला ठाकरे, संग्राम साळवे, वंदना नाठे, पल्लवी पगार आदींसह नागरिक उपस्थित होते.

नाशिक रोड रेल्वे स्थानक

स्वच्छता पंधरवडा अंतर्गत रेल परिषद, आदर्श विद्या मंदिर, रोटरी क्लब ऑफ नाशिक वेस्ट, रोटरॅक्ट क्लब ऑफ नाशिक मेट्रो व नाशिकरोड रेल्वे स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी (ता.१) महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी आदर्श विद्या मंदिरच्या प्राचार्या मनिषा विसपुते, राहुल औटे, रेल परिषदेचे गुरमित रावल, रोटरी नाशिक वेस्टेचे अध्यक्ष परेश चिटणीस, रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० चे रोटरॅक्ट नीलेश चौधरी, श्रेया दंडगव्हाळ, नाशिकरोड रेल्वे स्टेशनचे प्रबंधक आर. के कुठार, हरपूलसिंग यादव, जितेंद्र कोठावदे, आशिष नागदेवते, सचिन महाजन आदी उपस्थित होते.

यावेळी आदर्श विद्या मंदिर या शाळेचे विद्यार्थ्यांनी स्ट्रीट प्लेच्या माध्यमातून समूह नृत्यातून समूह गीतातून रेल्वे प्रवाशांचे विविध माध्यमातून स्वच्छता प्रबोधन केले. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित समूहनृत्य सादर केले रेल्वे स्टेशनवर स्वच्छता रॅली काढण्यात आली.

यावेळी विजय पगारे, कबीर पठाण, विजय कागडा, जितेश सोहत्रे, शोभा विरमल,ज्योती तायडे, नंदा बोदडे,गणेश मोरे, कृष्णा शेलार, तुलसीदास सकट, शैला जगताप, सूरज गहलोत, गोदाबाई तायडे, इंदू वाघ, नंदाताई पगाडे, मंगलबाई इवरावे यांचा रोटरॅक्ट क्लब नाशिक मेट्रोतर्फे सत्कार केला. प्रास्ताविक प्राचार्या मनिषा विसपुते यांनी तर सूत्रसंचालन दीपाली आहेर यांनी केले.

Manisha Vispute, Principal of Adarsh ​​Vidya Mandir, on the occasion of cleanliness drive at Nashik Road Railway Station
Cleanliness Drive : धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे 200 टन कचरा संकलीत; जिल्हाभरात स्वच्छता अभियान

ग्रामीण पोलिस मुख्यालय

नाशिक : आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने रविवारी (ता.१) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांच्यासह अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, अंमलदार सहभागी झाले होते.

यावेळी अधीक्षक कार्यालय, पोलिस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग, बिनतारी संदेश विभाग, नियंत्रण कक्ष, जिल्हा विशेष शाखा, स्थानिक गुन्हेशाखा, पोलिस परेड मैदान, वाचनालय, उपहारगृह, बहुउद्देशीय हॉल, निवासस्थाने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

याप्रसंगी स्वच्छतेचे महत्त्व पटवून कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर, प्लॅस्टिक वापरास पर्याय शोधणे, प्रसाधनगृह आदींच्या स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पिंपळदमध्ये स्वच्छता अभियान

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो क्षेत्रीय कार्यालय, मानवधन शैक्षणिक संस्था आणि पिंपळद ग्रामस्थांतर्फे गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

यात वालदेवी धरण परिसर, स्मशानभूमी परिसर, शाळा परिसर, गाव मंदिर परिसर, अजानवृक्ष आश्रम परिसर येथे स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय अधिकारी एस.बी. मालखेडकर, मानवधन संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, ग्रामसेवक विनोद साबळे, सरपंच अलका भाऊसाहेब झोंबाड, उपसरपंच संजय अनार्थे, पोलिस पाटील सोमनाथ कारभारी बेझेकर, शिवराम महाराज म्हसकर, तंटामुक्त अध्यक्ष ग्रामपंचायत रामचंद्र खांडबहाले यांच्यासह शाळेतील शिक्षक विद्यार्थी अभियानात सहभागी झाले.

विशेष म्हणजे मानवधन संस्था सातत्याने ३६५ दिवस स्वच्छता अभियान राबवत आहे.

Manisha Vispute, Principal of Adarsh ​​Vidya Mandir, on the occasion of cleanliness drive at Nashik Road Railway Station
ZP Cleanliness Drive : स्वच्छता मोहिमेनंतर जिल्हा परिषद ओस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.