Swachh Bharat Abhiyan: स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता फोटो मोहीम

Swachh Bharat Abhiyan
Swachh Bharat Abhiyanesakal
Updated on

Swachh Bharat Abhiyan : स्वच्छ भारत अभियान महत्त्वाकांक्षी योजना ग्रामीण भागाकरिता राबविली जात आहे.

या अभियानामध्ये लोकसहभागाला आणखी चालना देण्यासाठी केंद्र शासनाने ३ जुलै ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गावामधील झालेल्या उत्कृष्ट कामांच्या अनुषंगाने ‘स्वच्छता फोटो मोहीम सुरू केली आहे. (Cleanliness photo campaign under Swachh Bharat Abhiyan nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Swachh Bharat Abhiyan
Nashik News: हृदयद्रावक! रस्त्याविना गरोदर महिलेने गमावला जीव

सदर कालावधीतील मोहिमेत हागणदारीमुक्त अधिकच्या विविध घटकांवर उत्कृष्ट दर्जाची छायाचित्र निर्मिती करून My Gov.in पोर्टलवर अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धेत गावातील कोणत्याही नागरिकाला सहभाग घेता येणार आहे.

स्वच्छ भारत अभियान टप्पा दोनमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनावर काम करण्यात येत असून हे काम पूर्ण झाल्यावर गाव हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित करण्यात येत आहेत.

मोहिमेत उत्कृष्ट छायाचित्रांना पुरस्कार देण्यात येणार असून, शासनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये या छायाचित्रांचा वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून करण्यात आले आहे.

Swachh Bharat Abhiyan
Nashik News: अपघातप्रवण 26 चौकांमधील अतिक्रमण हटणार; आयुक्त रुजू झाल्यानंतर अतिक्रमण विभागाला जाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.