Non- Agricultural Permission: जमिनींना अकृषिक परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा

उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शन पत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करताना निवृत्ती आरिंगळे, विक्रम कोठूळे आदी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करताना निवृत्ती आरिंगळे, विक्रम कोठूळे आदीesakal
Updated on

Non- Agricultural Permission : विहीतगाव येथील देवस्थान जमिनीची अनेक वर्षांची समस्या सुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जमिनीच्या एनए ऑर्डर संदर्भात महसूल विभागाने मंत्रालयातून मार्गदर्शन मागवले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांना हे मार्गदर्शन पत्र पाठवण्यात आले आहे. यासाठी आमदार सरोज अहिरे, पक्षाचे पदाधिकारी निवृत्ती अरिंगळे, विक्रम कोठुळे, संजय हांडोरे, विलास दुर्जड, गणेश खर्जुल यांनी अजित पवारांना साकडे घातले होते. निवृत्ती अरिंगळे, विक्रम कोठुळे यांनी अजित पवारांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली होत.

त्यांच्या प्रयत्नांना यश आले. मंत्रालयातून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शन पाठविण्यात आले. (Clear way for non agricultural permission for lands Guidance letter to Collectors as per order of Deputy Chief Minister ajit pawar nashik)

त्यामुळे अकृषिक परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे विहीतगावसह परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

विहीतगाव, बेलतगव्हाण व मानोली या गावाच्या जमिनीवर असलेले श्री बालाजी देवस्थान नावाबाबत जमिनीच्या एनए ऑर्डर संदर्भात महसूल विभागाने मंत्रालयातून मार्गदर्शन मागवले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत मार्गदर्शन पत्र पाठविल्याने अकृषिक परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आमदार सरोज अहिरे यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी याप्रकरणी देण्यात आले होते.

सुनावणी घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शेतकरी व देवस्थानचे पदाधिकारी यांची सुनावणी घेण्यात येऊन शेतक-याच्या जागांवरील देवस्थानचे नाव कसे हटवायचे याबाबत सविस्तर स्पष्टीकरण केले नव्हते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करताना निवृत्ती आरिंगळे, विक्रम कोठूळे आदी
Jain Muni Murder Case : लासलगावी जैन मुनींच्या हत्येचा निषेध; सकल जैन समाजातर्फे विराट मूक मोर्चा

त्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासनाने पुन्हा पत्र व्यवहार करून मंत्रालयाकडे मार्गदर्शन मागितले होते. चार दिवसांपूर्वीच पुन्हा या प्रश्नाबाबत आमदार सरोज अहिरे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, विक्रम कोठुळे, संजय हांडोरे विलास दुर्जड, गणेश खर्जुल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन याबाबत चर्चा करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची गळ घातली.

त्यासंदर्भात मंत्रालयातून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच येऊन शेतकऱ्यांच्या जागेवरील मार्गदर्शन पत्र तातडीने पाठविण्यात देवस्थानचे नाव हटविण्याचे आदेश आले.

त्यामुळे विहीतगाव बेलतगव्हाण, मनोली या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनींना अकृषिक परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करताना निवृत्ती आरिंगळे, विक्रम कोठूळे आदी
Nashik News: नाशिक रोडच्या प्रस्तावित कोठारी नाट्यगृहाला शासनाकडून 5 कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()