आदिवासी विद्यार्थिनीसह पालकाला लिपिकांची अरेरावी; तक्रार दाखल

statement has been given to Additional Tribal Commissioner Sandeep Golait.
statement has been given to Additional Tribal Commissioner Sandeep Golait.esakal
Updated on

नाशिक : वसतिगृहाच्या प्रवेशासंदर्भात विभागाच्या यादीत महाविद्यालयाचे नाव समावेश करण्यासाठी आलेल्या आदिवासी विद्यार्थिनी (Tribal student) व तिच्या पालकांना कार्यालयातील लिपिकाने (Clerk) अरेरावी करत अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल संबंधित लिपिकाचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे करण्यात आली आहे.

या प्रकरणी अपर आदिवासी आयुक्त संदीप गोलाईत यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात देखील संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार देखील करण्यात आली. (clerk quarrel with Adivasi students with guardian Complaint filed nashik Latest Marathi News)

मुळेगाव (ता.त्र्यंबकेश्‍वर) येथील निर्मला भस्मा ही ओढा येथील आडगाव-पिंप्री रस्त्यावरील रामराज ग्लोबल कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी (विज्ञान शाखा) मध्ये शिक्षण घेते. ‘स्वयंम’ योजनेसाठी सदर महाविद्यालयाचे नाव आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहाच्या यादीत समावेश करण्यासाठी व प्रवेशासंदर्भात माहिती घेण्यासाठी निर्मला ही वडील अंकुश भस्मा यांच्यासोबत गुरुवारी (ता.२१) प्रकल्प कार्यालयात गेली.

याठिकाणी असलेल्या वरिष्ठ लिपिक महेश कुलथे यांच्याकडे त्यांनी विचारपूस केली असता त्यांनी थेट या विद्यार्थिनींसह तिच्या वडिलांसोबत अर्वाच्य भाषा वापरत अरेरावी करून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली.

statement has been given to Additional Tribal Commissioner Sandeep Golait.
कर्जवसुलीसाठी गावागावांमध्ये दवंडी; सहकार विभागाचा कृती कार्यक्रम जाहीर

तसेच सदर महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा प्रवेश रद्द करण्याची धमकी देखील विद्यार्थिनीच्या पालकास दिली. यानंतर घडलेला प्रकार अंकुश भस्मा यांनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष लकी जाधव यांना सांगितल्यानंतर संघटनेच्यावतीने त्यांनी अपर आदिवासी आयुक्त संदीप गोलाईत यांची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगत तत्काळ त्यांचे निलंबन करण्याची मागणी केली.

त्यानंतर संबंधित पालक यांनी मुंबई नाका पोलिस ठाणे गाठत श्री. कुलथे यांच्याविरुद्ध तक्रार करत ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

statement has been given to Additional Tribal Commissioner Sandeep Golait.
Nashik : काझी गढीची माती ढासळली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()