Nashik News : अट्टल घरफोड्या जेरबंद; 11 घरफोड्यांची कबुली

Bulglary Criminal Arrested
Bulglary Criminal Arrestedesakal
Updated on

नाशिक : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भरदिवसा साडेतीन लाखांची घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले. चौकशीतून संशयिताने गेल्या २ वर्षात ११ घरफोड्या केल्याची कबुली दिली.

मुख्य संशयितांसह तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पाच लाख ८५ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

शहानवाज ऊर्फ बरग्या अन्वर खान (४०, रा. गुलशननगर, वडाळा गाव), असे अट्टल घरफोड्यांचे नाव असून, चोरीचे दागिने विकण्यास मदत करणाऱ्या मनोज ऊर्फ बाळा त्र्यंबक गांगुर्डे (३०, रा. गोपाळकृष्ण चौक, भुजबळ फार्म जवळ, जुने सिडको) आणि पवन रवींद्र कुलकर्णी (३८, रा. हनुमान चौक, राणाप्रताप चौक, सिडको) यांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एका दुचाकीसह ५ लाख ८५ हजार ३४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Clever Burglary Thief jailed Confession of Eleven burglaries Nashik News)

Bulglary Criminal Arrested
Nashik News : मीनाताई ठाकरे उद्यानात स्वच्छता मोहीम; उद्यानातील खेळण्यांची लवकरच दुरुस्ती!

१ जानेवारीला भरदिवसा वडाळा रोडवरील फातिमा टॉवर इमारतीतील एका फ्लॅटची घरफोडी करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास मुंबई नाका पोलिसांप्रमाणेच गुन्हे शाखा युनिट एकचे निरीक्षक विजय ढमाळ यांच्या पथकानेही सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिस कर्मचारी प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे आणि मुक्तार शेख यांनी संशयितांची ओळख पटविली.

शहानवाज राजस्थानात दडून बसल्याची माहिती मिळाली असता, त्याला अटक केली. शहानवाज याने चोरी केलेले दागिने मनोज गांगुर्डे आणि पवन कुलकर्णी हे कुटुंबांतील महिला सदस्यांच्या मदतीने सराफ व्यावसायिकांना विक्री करायचे.

गेल्या दोन वर्षात संशयितांनी ११ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. मुंबई नाका आठ, तर इंदिरानगर हद्दीतील चार घरफोड्यांचा समावेश आहे. संशयितांकडून ११ लाख ७० हजार ७५८ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

Bulglary Criminal Arrested
Jalgaon News : पतंग उडविताना खबरदारी घ्या!

सदर कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे निरीक्षक विजय ढमाळ, उपनिरीक्षक विष्णू उगले, हवालदार रवींद्र बागूल, आसिफ तांबोळी, प्रशांत मरकड, विशाल देवरे, अण्णासाहेब गुंजाळ आदींनी केली.

पाच दहा मिनिटात घरफोडी करण्यात हातखंडा

शहानवाज हा सराईत गुन्हेगार असून २०१५-१६ मध्येदेखील त्याच्यावर आठ गुन्हे दाखल आहेत. परंतु त्यानंतर तो शहर सोडून गेला होता. कोरोना काळानंतर तो पुन्हा शहरात परतला. तो एका भंगार विक्रेत्यांकडे कामाला आहे. कमी सदनिका असलेल्या इमारतीमधील बंद सदनिका भरदिवसा ५-१० मिनिटात फोडून त्यामधील ऐवज चोरण्यात शहानवाज याचा हातखंडा असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

Bulglary Criminal Arrested
Nashik Accident News : सिन्नर शिर्डी महामार्गावर बस व ट्रक ची धडक झाल्याने भिषण अपघात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.